शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 21 हजार महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 10:06 IST

पुणे, दि. 26 -  पुण्याचा अधिपती  दगडूशेठ गणपतीच्या जयघोषात सुमारे 21 हजार महिला सहभागी होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ...

पुणे, दि. 26 -  पुण्याचा अधिपती  दगडूशेठ गणपतीच्या जयघोषात सुमारे 21 हजार महिला सहभागी होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंख निनादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेली २९ वर्षचालू असलेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे यंदा ३० वे वर्ष आहे. प्रत्येक महिलेला ट्रस्टच्या वतीने उपरण, बॅच तसेच प्रसाद देण्यात आला. सुमारे 21 हजार महिलांच्या उपस्थितीत आणि गणेशाच्या जय घोषात संपुर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. जय गणेश, जय गणेश च्या घोषणा देत महिला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत होत्या. 

मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच संयोजक यांनी कार्यक्रमाची नियोजन उत्तम प्रकारे केले होते. महिलांबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती, व पुरुष मंडळी या अथर्वशीर्ष पठणात सहभागी झाले होते. यावेळी  माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महापौर मुक्ता टिळक,  अशोक गोडसे, आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव