शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

२०२ लाचखोरांना सुटेना खुर्चीचा मोह, नागपूरमध्ये सर्वाधिक लाचखोरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 11:13 IST

२०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊन देखील २०२ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नागपूर परिक्षेत्रातील सर्वाधिक (५८) लाचखोरांसह मुंबईतील ३४ जणांचा समावेश आहे. 

मुंबई : अहमदनगरमधील एक कोटीच्या लाच प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच लाचखोरीच्या कारवाईत अडकलेले राज्यभरातील २०२ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत. त्यांच्यावर अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा झालेल्या १६ जणांवर बडतर्फीची कारवाईही झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आणि प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे लाचखोर खुर्चीवर ठाण मांडून बसल्याचे धक्कादायक वास्तव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) आकडेवारीतून सामोरे आले आहे. यात नागपूरच्या लाचखोरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊन देखील २०२ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नागपूर परिक्षेत्रातील सर्वाधिक (५८) लाचखोरांसह मुंबईतील ३४ जणांचा समावेश आहे. विभागनिहाय आकडेवारीनुसार ग्राम विकास (५९) , शिक्षण, क्रीडा (४८), महसूल/नोंदणी/ भूमी अभिलेख (१८), सहकार पणन व वस्त्रोद्योग (६), नगर विकास (२७) आणि पोलिस, होमगार्ड आणि कारागृह विभागातील (१८) जणांचा समावेश आहे. तर, अन्य विभागांतील प्रत्येकी १ ते ४ जणांचा समावेश आहे. 

वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे... गेल्या वर्षी लाचखोरीच्या प्रकरणात राज्यात ७४९ गुन्ह्यांची नोंद झाली. यामध्ये सापळा कारवाईत १ हजार ३४ आरोपी पकडले गेले.  या वर्षी २ नोव्हेंबरपर्यंत ७११ गुन्ह्यांची नोंद होत १ हजार ३० जणांवर एसीबीने कारवाई केली. पण, लाचखोरीला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने लाचखोरांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे हे लाचखोर वर्षानुवर्षे तेथेच चिकटून आहेत.

कुठल्या परिक्षेत्रातील किती लाचखोर खुर्चीतपरिक्षेत्र        लाचखोर मुंबई            ३४ठाणे            १७पुणे               ११नाशिक            १३नागपूर            ५८अमरावती        ३१छत्रपती संभाजीनगर २१नांदेड           १७एकूण        २०२

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण