शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

अध्यापकांना 20 ते 40 टक्के मानधनवाढ, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडणार नाही खंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 06:29 IST

१०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालये,  संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन तसेच  कला महाविद्यालये यांमध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणांमुळे रिक्त आहेत.  विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून  रिक्त पदांवर तासिका तत्त्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येत असून अशा  अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती  उच्च आणि  तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी  विधानसभेत दिली.

या निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी  ६२५ रुपयांवरून  एक हजार रुपये प्रति तास आणि  पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७५० रुपयांवरून  एक हजार रुपये प्रतितास मानधन मिळेल.  शिक्षणशास्त्र,  शारीरिक शिक्षण,  विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी ७५० रुपयांवरून  एक हजार रुपये मानधन मिळेल. उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ, ज्येष्ठ अभियंता यांच्या व्याख्यानासाठीचे मानधन एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपये तर पदवी तसेच  पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन ६०० रुपयांवरून एक  हजार रुपये तर पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन ५०० रुपयांवरून ८०० रुपये  असेल.

कला शिक्षण पदविका तसेच पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर ६२५ रुपयांवरून एक  हजार प्रतितासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे, तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. 

रिक्त पदे भरणारविद्यार्थ्यांचे  शैक्षणिक हित आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे लवकरच  भरण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी  दिली. वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील