शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 6:29 AM

  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी देण्यासाठी खुल्या बाजारातून तब्बल २० हजार कोटींच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली.

मुंबई -  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी देण्यासाठी खुल्या बाजारातून तब्बल २० हजार कोटींच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली.शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ३४,०२२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यापैकी सुमारे २० हजार कोटींची रक्कम खुल्या बाजारातून कर्जाच्या रूपात उभारण्यास परवानगी देण्याची विनंती राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली होती. राज्य शासनाच्या या मागणीला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली आहे. भाजपा सदस्य अपूर्व हिरे आणि अनिल सोले यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न विचारला होता.शेतकरी कर्जमाफीसाठी शेतक-यांनी भरलेल्या आॅनलाईन अर्जातील माहिती आणि बँकांकडील माहिती यांची सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ताळमेळ घालून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. या यादीच्या आधारे पात्र शेतक-यांसाठी कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपोटी रकमा बँकांना पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत ३१.३३ लाख शेतक-यांच्या बँक खात्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र अर्जदार शेतक-यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी आपल्या सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरी