शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृताच्या वारसास मिळणार २० लाख; जखमींच्या नुकसान भरपाईमध्येही वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 06:37 IST

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवितहानी तसेच पाळीव प्राण्याच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारने वाढ केली आहे.

मुंबई :

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवितहानी तसेच पाळीव प्राण्याच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारने वाढ केली आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबत घोषणा केली. गव्यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन याबाबतही भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

वाघ, बिबट्या, रानडुक्कर, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, हत्ती आणि रानडुकरे आदी वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसास किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून यापुढे १५ लाख रुपयांऐवजी २० लाख रुपये इतके मदत देण्यात येणार आहे. यापैकी १० लाख रुपये संबंधित वारसास तत्काळ धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्कम १० लाख रूपये त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. 

हल्ल्यात कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस ५ लाख रुपये, गंभीर जखमीस १ लाख २५ हजार रुपये तर किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार असून खासगी रुग्णालयात औषधोपचार केल्यास त्याची मर्यादा २० हजार रूपये प्रती व्यक्ती राहील.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये सन २०१९-२० मध्ये ४७, २०२०-२१ मध्ये ८०, तर २०२१-२२ यावर्षी ८६ इतकी मानवी जीवितहानी झाली आहे.

गाय-बैलाचा मृत्यू झाल्यास मिळणार ७० हजार

  • वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारी ६० हजार रूपयांची मदत वाढवून ती ७० हजार रूपये इतकी करण्यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास १० हजार रूपयांऐवजी १५ हजार रूपये मदत करण्यात येणार आहे. 
  • गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास १२ हजार रुपयांऐवजी १५ हजार रूपये, तसेच गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास ४ हजार रुपयांऐवजी ५ हजार रूपये एवढी नुकसान भरपाई देण्यात येईल.  
टॅग्स :Tigerवाघ