शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

२० लाख क्विंटल तूर : तूर भरडाईच्या निविदांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:47 IST

शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे.

- राजेश निस्तानमुंबई - शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. पर्यायाने २० लाख क्ंिवटलपेक्षा अधिक तूर शासकीय गोदामांमध्ये पडून आहे.शासनाने २५ लाख क्ंिवटल तुरीची खरेदी केली. मात्र अनेक महिने पणन मंत्री, सचिव व मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी लक्ष न दिल्याने ही तूर पडून राहिली. अखेर या तुरीची डाळ बनवून ती शासकीय योजनांमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने तूर भरडाईची निविदा काढली. त्यात १३ दालमिलने सहभाग घेतला होता. मात्र मर्जीतील व्यापाºयांना काम देता यावे म्हणून तांत्रिक कारण दर्शवून पुन्हा निविदा काढल्या गेल्या. मुंबईतील राठी यांच्या सप्तश्रृंगी आणि गुप्ता यांच्या ईटीजी कंपनीला भरडाईचे कंत्राट दिले गेले. वास्तविक या दोनही कंपन्यांची २० लाख क्ंिवटल तूर भरडाईची क्षमताच नसल्याचे सांगितले जाते. प्रति क्ंिवटल तुरीमागे ६७.७५ टक्के उतारा (तूरडाळ) देण्याच्या अटीवर कंत्राट दिले गेले. मात्र या संस्थांच्या तूर भरडाईची गती प्रचंड मंद आहे. आतापर्यंत केवळ २ लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. तर दुसरीकडे २० लाख क्ंिवटल तूर अद्यापही गोदामात पडून आहे. नव्याने खरेदी होत असलेली तूर साठवावी कुठे याचा पेच पणन व सहकार खात्यापुढे कायम आहे. वेळेत भरडाई होत नसतानाही त्या दोन कंत्राटदारांवर पणन खात्याने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.निकृष्ट डाळीचा पुरवठाशासकीय गोदामातील तुरीपासून बनविलेली दर्जेदार डाळ जादा किमतीत बाजारात विकली जात असून निकृष्ट दर्जाची डाळ शासनाला दिली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. हीच निकृष्ट डाळ पोषण आहारातून लहान मुलांच्या पोटात जात आहे. सीआयडी चौकशी झाल्यास यातील मोठे घबाड उघड होईल.दुस-यांदा निविदाआतापर्यंत सव्वादोन लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. मागणीनुसार ती करून दिली जात आहे. त्यासाठी वेळेचे बंधन नाही. भरडाईचे काम दोन महिन्यांपासूनच सुरू झाले आहे. १३ संस्था सक्षम नसल्याने दुसºयांदा निविदा काढावी लागली.- अनिल देशमुख, सरव्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन, मुंबई.खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर परत!पिंजर (अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर, वेअर हाउसने निकृष्ट ठरवत परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावर आठ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी झाली होती. तूर परत आल्याने शेतकºयांचे चुकारेही लांबणीवर पडले आहेत. तुरीचा दर्जा उत्तम असतानाही परत केल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्रagricultureशेती