शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

जिंतूर तालुक्यात २० कोटींचे बंधारे होणार

By admin | Updated: June 12, 2017 19:47 IST

लघुसिंचन पाटबंधारे विभागाच्या वतीने २० कोटी रुपये खर्च करून ६७ नवीन बंधारे होणार आहेत.

ऑनलाइन लोकमतजिंतूर ( जि. परभणी), दि. 12 -  तालुक्यात लघुसिंचन पाटबंधारे विभागाच्या वतीने २० कोटी रुपये खर्च करून ६७ नवीन बंधारे होणार आहेत. यापैकी ३० बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बंधाऱ्याच्या कामाच्या निविदा भरण्यावरून राजकीय पक्षांमध्ये तू तू मै मै होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.जिंंतूर तालुक्यात लघु सिंचन पाटबंधारे विभागाच्या वतीने २० कोटीं रुपयांचे ६७ नवीन बंधारे उभाण्यात येणार आहेत. यातील २३ बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तालुक्यातील कौसडी येथे ९० लाख ३० हजार, मोहखेडा येथे ५६ लाख, कोरवाडी ५७ लाख, करवली ८६ लाख, जांभरून ४० लाख, देवगाव धानोरा ३५ लाख, आडगाव बाजार १ कोटी २६ लाख, अंबरवाडी १ कोटी २ लाख, राव्हा १ कोटी १० लाख, गुळखंड १ कोटी १३ लाख, धामणगाव १ कोटी १७ लाख, वस्सा ६० लाख, दहेगाव ४० लाख, पिंपळगाव काजळे ६१ लाख, मांडवा ४० लाख, आसेगाव १ कोटी ९ लाख, बामणी ५० लाख, भोगाव ४१ लाख, मोळा ३५ लाख, निवळी खुर्द १ कोटी १७ लाख, पाचेगाव ४१ लाख, सांगळेवाडी ७० लाख, शिंदे टाकळी ४३ लाख, गुगळी धामणगाव ८२ लाख, शिंगटाळा ४० लाख, डासाळा ६४ लाख, जवळा ४३ लाख, डिग्रस ८२ लाख, अशी एकूण २३ कामे मंजूर झाली असून १३ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांची कामे कार्यारंभ आदेशासाठी लघु पाटबंधारे विभागाकडे आहेत. तालुक्यातील यापूर्वीच्या २५ ते ३० मोठ्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.तसेच संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याची कामे निकृष्ट केल्याने अनेक बंधारे लिकेज झाले आहेत.त्यामुळे साठवण क्षमता फारशी राहिली नाही. परिणामी कोट्यावधींचा खर्च होऊनही बंधारे मात्र कोरडेच राहिले आहेत. खासदारांनीही केली तक्रारखा. बंडू जाधव यांनी तालुक्यातील कोरवाडी, कुऱ्हाडी, सावंगी भांबळे, संक्राळा, कोक, रिडज, करवली येथील २०१६-१७ मध्ये झालेली बंधाऱ्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असंल्याची तक्रार कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे . तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साखरतळा येथे झालेला बंधाराही निकृष्ट झाल्याची तक्रारही खा. जाधव यांनी केली आहे.राजकीय गुत्तेदार सरसावलेतालुक्यात बंधाऱ्यांची कामे आपल्यालाच मिळावी, यासाठी राजकीय गुत्तेदार मोठी लॉबिंग करीत आहेत. इतर ठिकाणच्या गुत्तेदाराला कामे करता येऊ नये, यासाठी निविदा मॅनेज व दबाव टाकण्याचा प्रकार सर्रास तालुक्यात होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चांगले कंत्राटदार कामे करण्यास धजावत नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे निविदा कोणालाही सुटल्या तरी कामे मात्र राजकीय गुत्तेदारच करतात. त्यामुळे दर्जाहीन कामात वाढ झाली आहे. लघुसिंचन पाटबंधारे विभागांतर्गत ६७ कामांपैकी पहिल्या टप्प्यात २३ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित कामाचे आदेश लवकरच काढण्यात येतील. मात्र पावसानंतर ही कामे सुरू होतील.- संजय पडलवार, कार्यकारी अभियंता