शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जनआरोग्य’मध्ये ५ लाखांच्या विम्यासाठी पाहा २ महिने वाट; उपचार दूरच, कवचही मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 06:28 IST

राज्यातील १००० रुग्णालयांचा यात सहभाग, सरकारने फक्त पाठ थाेपटून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून राज्यभरासाठी लागू केलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर ही योजना प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या योजनेअंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देत आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करून राज्य सरकारने स्वतःचे कौतुकही करून घेतले होते. योजना राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे संपूर्ण राज्यात राबविली जाते. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासंबंधीचा मोठा निर्णय २७ जुलै रोजी जाहीर केला.

विशेष म्हणजे, राज्यातील १००० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६ वरून १३५६ इतकी केली. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक (डोमिसाइल सर्टिफिकेट) कुटुंबांनाही ती लागू केली गेली आहे.सध्याच्या अस्तित्वात असलेल्या या योजनेसाठीचा सोसायटीकडून प्रीमियम युनायटेड इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबाकरिता ८५५ रुपये इतका सरकारतर्फे दिला जातो. त्याकरिता शासन वर्षाला या कंपनीला १७७० कोटी वर्षासाठी देते.  महाराष्ट्र आरोग्य पाहणी अहवालानुसार २ कोटी २२ लाख  या योजनेसाठी लाभार्थी ठरलेले आहे. एक कुटुंब म्हणजे ४ ते ५ व्यक्तींना हा लाभ मिळू शकतो.

योजनेच्या कार्डधारकांनाच लाभ

  • २०१२ साली सुरू झालेल्या या योजनेत गरीब रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत आहेत. योजनेनुसार सध्या ९९६ आजारांचा समावेश असून, राज्यातील शासकीय व बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांत ही योजना आहे.

राज्यात सध्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळते. मात्र, या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा त्यांचे नाव यापूर्वीच योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच लाभ मिळतो. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही.

पाच लाखांच्या नव्या याेजनेत आजाराची संख्या वाढविली आहे. सर्वांनाच ही योजना लागू आहे. आता इन्शुरन्स कंपनीला द्यावा लागणारा प्रीमियम बदलणार आहे. नवीन इन्शुरन्स कंपनी शोधून त्यांना सध्याच्या नवीन योजनेतील लाभार्थींची संख्या आणि कवच याची माहिती देऊन प्रीमियम द्यावा लागेल. निविदा प्रक्रियेचे काम सुरू केले आहे. ते दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.- विनोद बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी

टॅग्स :Healthआरोग्यState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल