शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख शेतकऱ्यांना मेमध्ये दोनऐवजी ४ हजार मिळणार; पहिला हप्ता खात्यात होणार जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 13:27 IST

सरकारकडून ही योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रु. मिळणार आहेत.

मुंबई - प्रधानमंत्री किसान सन्मान निधीप्रमाणेच राज्य सरकारदेखील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबवत आहे. त्याचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारऐवजी चार हजार जमा होणार आहे.  

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर होणार अंमलबजावणी सरकारकडून ही योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रु. मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ६, ००० रु. व नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत ६००० रु. अशी एकंदरीत १२,००० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आहे.

मे महिन्यांत शेतकऱ्याला मिळणार दोनऐवजी चार हजार दर चार महिन्याला केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २००० रुपयांचा हप्ता वितरित करण्यात येईल. या योजनेचा पहिला हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या शेवटी वितरित केला जाईल, अशी माहिती दिली जात आहे.

राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक मदत द्यावी. यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे.

९६ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ !नमो शेतकरी महासन्मान निधी योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ राज्यातील जवळपास ९६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठीच्या अटी, शर्ती व पात्रता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच असेल.

टॅग्स :Farmerशेतकरी