शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

टोमॅटो अवघा २ रुपये किलो; ग्राहक खुश, पण लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 07:22 IST

नाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी  कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड येथील बाजार समित्यांमध्ये २ ते ४ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने, टोमॅटो उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. 

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात उत्पादक हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी  कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड येथील बाजार समित्यांमध्ये २ ते ४ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने, टोमॅटो उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मंगळवारी सुमारे ५ हजार  कॅरेट टॉमेटोंची आवक झाली. प्रतिकॅरेटला ४0 ते ८१ रुपयांपर्यंत (२0 किलोचे एक कॅरेट) भाव मिळाला. अत्यंत कमी भाव  मिळाल्याने, लागवडीचा खर्चही  निघत नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. देशातील विविध राज्यांमध्ये वाढते उत्पादन व खरेदीदार राज्यांची गरज भागवून, शिल्लक राहिलेल्यामुळे टोमॅटोचे भाव घसरले असून, उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही कालावधीपूर्वी टोमॅटो उत्पादन करणार्‍या राज्यांमध्ये  हवामानाचा फटका बसल्याने, महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोंची मागणी वाढली होती. मोठा आकार, प्रतवारी, दर्जा टिकवणक्षमता अशी वैशिष्ट्ये असलेल्या टोमॅटोंना ५0 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला होता. त्यामुळे उत्पादकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. मात्न, सध्या परिस्थिती बदलली आहे. गुजरात राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर टॉमेटो उत्पादन सुरू असल्याची माहिती व्यापारी व निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली. गुजरातमधून शेकडो ट्रक टॉमेटो दिल्ली येथे जातो. आंध्र प्रदेश,  तामिळनाडू या राज्यांमध्ये कर्नाटक येथून टॉमेटो जातो, तर छत्तीसगड या राज्यातून ओरिसा, भुवनेश्‍वर या ठिकाणी टोमॅटो विक्रीसाठी जातो. राजस्थान  भागातील टोमॅटो  स्थानिक गरजपूर्तीनंतर गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या काही भागांमध्ये पाठविण्यात येतो. त्यामुळे पूर्वी ज्या राज्यामध्ये टोमॅटोची मोठय़ा प्रमाणावर मागणी होती, त्या राज्यांमध्ये टोमॅटो  उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने महाराष्ट्रातील भाव घसरल्याची माहिती उंबरे यांनी दिली.लातूर भागातही लक्षणीय उत्पादन असल्याने नाशिक जिल्ह्यातील उत्पादकांना सॉस तयार करणार्‍या, तसेच मुंबई भागातील ग्राहक असे पर्याय उरले आहेत. सॉस तयार करणार्‍या कंपन्या २ रु पयांपासून टोमॅटो खरेदी करतात. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दह्याणे, दिंडोरी तालुक्यातील उमराळे व कोराटे, तसेच जळगाव जिल्ह्यातील कंपन्यांचा यात समावेश आहे. सॉस तयार करणार्‍या कंपन्या खरेदीदार असल्याने, तेवढी तरी दिलासादायक बाब उत्पादकांसाठी आहे. दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा व उपबाजारात थोड्या-फार फरकाने टोमॅटो खरेदी करणारे व्यापारी मुंबई, कल्याण याबरोबर गुजरात राज्यातील दिव-दमण या केंद्रशासित भागात टॉमेटो पाठवितात. मात्न, अपेक्षित फायदा होत नाही, तसेच बहुतांशी कमी दरात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान सोसण्याची तयारी ठेवावी लागते, अशी स्थिती आहे. यामुळे याचा एकत्रित परिणाम भाव घसरण्यावर झाल्याने उत्पादक धास्तावले आहेत.सॉस कंपन्यांकडून टॉमेटोंची खरेदी गुजरात राज्यातही टॉमेटो विक्रीसाठी जातो आहे. सॉस बनविणार्‍या कंपन्यांनाही सध्याची स्थिती टॉमेटो खरेदीसाठी अनुकूल असल्याने, आडत्यांच्या माध्यमातून अशा कंपन्या मोठय़ा प्रमाणावर टॉमेटो खरेदी करीत आहेत. 

जिल्ह्यातील बाजारपेठांत नीचांकी भावचांदवड, पिंपळगाव, वणीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये  टोमॅटोला सरासरी २ ते ४ रुपये भाव मिळाला. चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी टोमॅटोचे बाजारभाव अवघे ४ रुपये किलोवर आल्याने शेतकरी हैराण झाले. गत सप्ताहात टोमॅटोचे बाजारभाव कोसळले होते. तेव्हा टोमॅटो प्रतिकॅरेटला ५0 रुपये (२0 किलोचे कॅरेट) असे भाव असताना, या सोमवारी मात्र १११ रुपये जास्तीतजास्त, तर कमीतकमी ८५ रुपये प्रतिकॅरेट भाव होता. त्यामुळे ४ रुपये किलोप्रमाणे बाजारभाव होते. दरम्यान, कालच्या आठवडे बाजारात किरकोळ हातविक्रीसाठी टोमॅटो ८ ते १0 रुपये प्रतिकिलो भाव होता. 

टॅग्स :vegetableभाज्याNashikनाशिक