शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३३ कोटी १ लाख ३१ हजार ५३२ वृक्षलागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 03:16 IST

वनविभागाची ५० कोटी वृक्षलागवड मोहीम फत्ते

चंद्रपूर : राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या वर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता झाली असून २५ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारपर्यंत ३३ कोटी एक लाख ३१ हजार ५३२ एवढी वृक्षलागवड राज्यात झाली आहे.हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने राज्यात तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार जाहीर केला होता. सन २०१६ मध्ये १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. वृक्षारोपणाच्या या मोहिमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यात दोन कोटी ८३ लक्ष इतकी वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. या वेळीसुद्धा पाच कोटी ४३ लक्ष झाडे राज्यात लावण्यात आली. सन २०१८ मध्ये १ जुलै ते ३० जुलैपर्यंत १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या संकल्पाच्या पूर्ततेसाठीसुद्धा जनतेचा लक्षणीय सहभाग लाभला व राज्यात १५ कोटी ८८ लक्ष वृक्षलागवड करण्यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘मन की बात’ या कार्यक्रमात या मोहिमेचे कौतुक केले.या वर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. हा संकल्पसुद्धा ३० सप्टेंबरपूर्वीच पूर्ण झाला असून बुधवारी दुपारपर्यंत राज्यात ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ इतक्या वृक्षलागवडीची नोंद झाली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचा निर्धार पूर्ण केला आहे.हे लोकसहभागाचे यश - सुधीर मुनगंटीवार३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या या यशाचे संपूर्ण श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीचे हे यश लोकसहभागाचे आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व घटकांचे त्यांनी आभार मानले आहेत.