शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना काळात हाॅटेल, रेस्टाॅरंटला १९० लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 05:25 IST

CoronaVirus News: तज्ज्ञांचे मत : काेराेनाचा फटका, सावरण्यासाठी लागणार माेठा अवधी

n  सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी गेल्या आठ महिन्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राचे सुमारे १९० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेल क्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास कमीतकमी दीड वर्षाचा तर रेस्टॉरंट क्षेत्र उभे राहण्यास कमीतकमी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.कोरोनासह लॉकडाऊनमुळे ३० ते ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद झाली आहेत; किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ४० ते ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यांना रोजगार देणारे क्षेत्रच रसातळाला गेले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार काम करतात. ही संख्या सुमारे ७० टक्के आहे. स्थानिक कामगार कमी संख्येने या क्षेत्रात आहेत, अशी माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने दिली.लॉकडाऊन शिथिल होत असले तरी अद्याप स्थलांतरित कामगार परत आलेले नाहीत. कारण रेल्वे अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास बराच अवधी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, मालमत्ता करात १ वर्षाची सवलत द्यावी, मार्च ते सप्टेंबर २०२० पर्यंत हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी व्याज माफ करावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.सरकारचे प्रयत्न उल्लेखनीयविमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर कदाचित काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवावे लागले हे खरे, मात्र महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत.- गुरुबक्ष सिंग कोहली, प्रवक्ता, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhotelहॉटेल