शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

तीन वर्षांत १८,५१० शाळा होणार डिजिटल

By admin | Updated: April 23, 2017 02:28 IST

बदलत्या काळानुरूप राज्यातील शिक्षण व्यवस्थेत बदल केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शाळा १०० टक्के डिजिटल करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

मुंबई : बदलत्या काळानुरूप राज्यातील शिक्षण व्यवस्थेत बदल केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शाळा १०० टक्के डिजिटल करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सब्लिटी (सीएसआर) आणि लोकसहभागातून राज्य शासन पुढच्या तीन वर्षांत १८ हजार ५१० शाळा डिजिटल करणार आहे. राज्यातील शाळांतील शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त अद्ययावत ज्ञान मिळावे, याकरिता राज्य स्तरावर उपाययोजना आखल्या जात आहेत. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत शाळांतील शिक्षण व्यवस्थेत बदल केले जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत शाळेतील शिक्षणात बदल करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रोटरी साउथ एशियन सोसायटीशी (आरएसएएस) सामंजस्य करार करण्यात आला आहे. यांच्या साहाय्याने शाळा डिजिटल करणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील शाळांमधील वर्ग १०० टक्के डिजिटल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. आरएसएएसबरोबर राज्यातील १८ हजार ५१० शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सामंजस्य करारानुसार, पुढील ३ वर्षांत डिजिटल करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये प्रामुख्याने शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर, खासगी अनुदानित शाळांची निवड करण्यात येणार आहे. ९ जानेवारी २०१७च्या शासन निर्णयाप्रमाणे, ज्या शाळांनी अजूनपर्यंत एक खोली डिजिटल करून घेतलेली नाही. अशा शाळांनी ँ३३स्र://१ङ्म३ं१८३ींूँ .ङ्म१ॅ/ी_’ीं१ल्ल_ेँं_ॅङ्म५ या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व बदलत्या तंत्रज्ञानाशी ताळमेळ साधत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या योजनेमागील हेतू आहे. त्या अनुषंगानेच शाळा डिजिटल करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.