शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Vaccination: महाराष्ट्राला चार दिवसांत Covishield मिळण्याची शक्यता; सीरमकडे राज्यांकडून ३४ कोटी डोसची ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 12:40 IST

Corona Vaccination in Maharashtra Age group 18 to 44: कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतरही लसीकरणाचा स्लॉट केवळ ४५+ असाच दाखवत होता. त्यातच केंद्र सरकारने आपण पुरवत असेलेली लस केवळ ४५ हून अधिक आणि कोरोना योद्ध्यांसाठीच देण्याची अट घातल्याने १ मे पासून चौथ्या टप्प्यातील लसीकरण सुरु होणे खूप कठीण आहे.

देशात कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination Drive) चौथा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. राज्यांकडे १८ ते ४४ वयोगटातील (18 to 44 age group) लोकांना देण्यासाठी लसच उपलब्ध नाहीय. यामुळे काल कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतरही लसीकरणाचा स्लॉट केवळ ४५+ असाच दाखवत होता. त्यातच केंद्र सरकारने आपण पुरवत असेलेली लस केवळ ४५ हून अधिक वयाच्या आणि कोरोना योद्ध्यांसाठीच देण्याची अट घातल्याने १ मे पासून चौथ्या टप्प्यातील लसीकरण सुरु होणे खूप कठीण आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी हे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. तसेच सीरम आणि बायोटेकला त्याची ऑर्डरही दिली आहे. (Serum Institute got 34 crore corona vaccine order from States and 2 crore from Private Hospital.)

Covishield लसीचे काय आहेत साईड इफेक्ट? लँसेटच्या अभ्यासात समोर आले सत्य

एकट्या महाराष्ट्राला १२ कोटी डोस लागणार आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडे (Serum Institute) आतापर्यंत विविध राज्यांनी ३४ कोटी डोस हवे असल्याची मागणी नोंदविली आहे. तर खासगी हॉस्पिटलनी त्यांना २ कोटी डोस हवे असल्याचे कळविले आहे. या राज्यांना कोव्हिशिल्ड लस हवी आहे. सुत्रांनुसार पुढील चार दिवसांत काही राज्यांना कोव्हिशिल्डचा पुरवठा केला जाऊ शकतो. या आठवड्यात पाच राज्यांना कोव्हिशिल्ड मिळणार आहे. (Serum Institute of India said it will start supplying the vaccines in four days. Five states will get the supplies this week, including Maharashtra.)

CoronaVirus in India: भयावह! देशात नवे रुग्ण, मृतांच्या संख्येत विक्रमी वाढ; 2.69 लाख बरे झाले

सीरम इन्स्टिट्यूटच्या सुत्रांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार सर्वात पहिला कोरोना लसीचा पुरवठा हा महाराष्ट्राला आणि अन्य चार राज्यांना केला जाणार आहे. उरलेल्या राज्यांना पुरवठा करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. जसजशी कोरोना लस राज्यांना मिळत जाईल तसतशी ती लस १८ पेक्षा जास्त वयोगटाच्या लोकांना दिली जाणार आहे. 

CoronaVirus News: राज्य कोरोना संकटात, तिजोरीवर मोठा भार; काँग्रेसनं घेतला महत्त्वाचा निर्णय

सीरमने लसीचे दर कमी केले सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लशीची प्रतिकुपी किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ही लस आता ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे ट्विट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केले आहे.नुकत्याच झालेल्या दरपत्रकानुसार ‘सीरम’ची कोविशिल्ड लस राज्यांना ४०० रुपयांना दिली जाणार होती. त्यावरून राज्यांकडून मोठा आक्षेप घेण्यात आला होता. खासगी रुग्णालयांत हीच लस ६०० रुपयांना उपलब्ध होणार होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली ही कोरोना प्रतिबंंधक कोविशिल्ड लस ‘सीरम’तर्फे भारतात उत्पादित करण्यात येत आहे.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस