मुंबई : महापालिकेच्या विविध खात्यांत सेवानिवृत्तीनंतर करार पद्धतीवर विशेष कार्य अधिकारी / सल्लागार या पदावर गेल्या ५ वर्षांत ४० नियुक्त्या झाल्या असून, यावर पालिकेने तब्बल १.७० कोटी रुपये खर्च केले आहेत. याची दखल आयुक्त अजय मेहता यांनी घेतली असून, विशेष कार्य अधिकारी / सल्लागार सेवा १ जूनपासून संपुष्टात आणण्याचे निर्देश दिले आहेत.यासंदर्भातील परिपत्रक २७ मे रोजी काढण्यात आले असून, सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, जरी आयुक्तांची थेट मंजुरी प्राप्त करून घेत नियुक्ती केलेली असल्यास, तीदेखील संपुष्टात आणावयाची आहे. या नियुक्त्या सुरू राहिल्यास त्यांची जबाबदारी संबंधित खातेप्रमुख / साहाय्यक आयुक्तांवर असणार आहे.
सल्लागारांवर १.७० कोटींचा चुराडा
By admin | Updated: June 1, 2015 04:57 IST