शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१७ जागांची अधिसूचना; उमेदवारांचा पत्ताच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 07:09 IST

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. उमेदवारीवरून असलेले पक्षांतर्गत वाद, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, यासाठी होत असलेली प्रतीक्षा आणि जातीय समीकरणे आदी कारणांमुळे भाजपासारख्या पक्षालादेखील उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत.नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशिम व चंद्रपूर या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसने नागपुरातून नाना पटोले, गडचिरोली-चिमूर येथून नामदेव उसेंडी यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.भाजपा-शिवसेना युतीमध्ये १७ पैकी १० जागा भाजपा, तर ७ जागा शिवसेना लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर नेमके जागावाटपही अद्याप जाहीर झालेले नाही. दोन टप्प्यांतील १७ पैकी १० जागा विदर्भातील आहेत. मुख्यमंत्री (पान १० वर)१३ राज्यांत १८ एप्रिलला मतदान; दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या तेरा राज्यांमधील ९७ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या दुसºया टप्प्यासाठी १८ एप्रिलला होणाºया मतदानासाठी मंगळवारी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली. दुसºया टप्प्यात महाराष्ट्रातील १0 मतदारसंघांतही मतदान होणार आहे.मतदान कधी?पहिला टप्पा11एप्रिलदुसरा टप्पा18 एप्रिलपहिला टप्पानागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली.दुसरा टप्पा : बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी नागपुरातून काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.दुसºया टप्प्याचाकार्यक्रम असाउमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली असून, २६ मार्च ही अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २७ मार्च रोजी होणार असून, अर्ज मागे घ्यायची मुदत २९ मार्च आहे. या ९७ मतदारसंघांमध्ये किती उमेदवार रिंगणात असतील, याचे चित्र २९ मार्च रोजी स्पष्ट होईल.दुसºया टप्प्यातकुठे निवडणुकातामिळनाडू (३९ जागा), कर्नाटक (१४), महाराष्ट्र (१०), उत्तर प्रदेश (८), आसाम (५), ओडिशा (५), बिहार (५), छत्तीसगड (३), जम्मू-काश्मीर (२), मणिपूर (१), त्रिपुरा (१), पुडुचेरी (१), पश्चिम बंगाल (३) या तेरा राज्यांत मतदान होईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र