शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण प्रतिज्ञापत्रासाठी १७ महिन्यांचा विलंब का?- पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:06 IST

सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, असे चव्हाण म्हणाले

कऱ्हाड (जि.सातारा): मराठा आरक्षणाबाबत न्यायालायात एक प्रतिज्ञापत्र द्यायला राज्यातील भाजप सरकारने १७ महिन्यांचा विलंब लावला. या बेजबाबदारीबाबत त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाची माफी मागायला पाहिजे,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.चव्हाण म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी तशी जुनीच आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रश्नात चांगले लक्ष घातले. छत्रपती शाहू महाराजांच्या आरक्षणापासून मराठा आरक्षणाची काय परिस्थिती होती, याची माहिती घेतली. ५२ टक्के घटनात्मक आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देता येऊ शकते. हे लक्षात आल्यावर मंत्रीसमिती गठीत केली, त्याचा अहवाल मागविला. दरम्यान, आमचे सरकार गेल्याने हा निर्णय होऊ शकला नाही. तोपर्यंत काहीजण याविरोधात कोर्टात गेले. कोर्टाने या नव्या सरकारला एक प्रतिज्ञापत्र मागितले होते. ते द्यायला यांनी १७ महिन्यांचा विलंब लावला.देशात मोदी व राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून नुसत्याच घोषणा केल्या. रोजगार निर्मितीचे स्वप्न दाखवले. मात्र, आज युवकांच्या हाती रोजगार नाही. केंद्र सरकारने तर शेतकऱ्यांना हमीभावाचं गाजर दाखवलं आहे. ऊसदर व दूधदराबाबत राज्य सरकारने नुसती शेतकºयांची फसवणूक केली आहे. मोदी सरकारकडून नुसत्या घोषणा देऊन जाहिरात करण्याचे काम केले जाते. मात्र, आता जनता यांच्या फसव्या घोषणांना व जाहिरातींना भूलणार नाही, असेही ते म्हणाले.‘एकास एक’ लढतीचा प्रयत्नभाजपाला रोखण्यास समविचारी पक्षांची आघाडी गरजेची आहे. प्रत्येक ठिकाणी एकास एक लढत होईल, असे प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.शिवसेनेशी आघाडी अशक्यकाँगे्रस व शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या भाजपच्या कारभारावर नाराज आहेत. आमच्या दोघांच्यात हा एक समान धागा असला तरी त्यांच्या व आमच्या पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे हे वेगवेगळे असल्याने आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी आघाडी ही अशक्यच असल्याचे मत चव्हाण यांनी मांडले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा