शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मराठा आरक्षणासाठी १६ ला खास अधिवेशन?; मंत्रिमंडळ बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 06:16 IST

कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना पितृसत्ताक कुटुंबपद्धतीनुसार कुणबी दाखले देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली होती. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे

मुंबई : Maratha Reservation Update ( Marathi Newsमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर  १६ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावण्याचा राज्य सरकारचा निर्णय जवळजवळ निश्चित झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे.  त्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा महामोर्चाही काढला होता. त्यानंतर कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींच्या सगेसोयऱ्यांना पितृसत्ताक कुटुंबपद्धतीनुसार कुणबी दाखले देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली होती. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून अध्यादेश न निघाल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार अधिवेशन घेण्याबाबत निर्णय घेत आहे. 

राज्यपालांचे अभिभाषण होणारदरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण होते. नियम असा आहे की, वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण व्हावे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षाच्या सुरुवातीला होणारे पहिले अधिवेशन असते. मात्र, आता मराठा आरक्षणासंदर्भात आधीच अधिवेशन होणार असल्यामुळे या अधिवेशनातच राज्यपालांचे अभिभाषण होईल.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडणार १६ फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. तसेच आरक्षणाबाबतचे विधेयकही मांडले जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांचा तपासणीसाठी नकार

सरकारने दिलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे शनिवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. जरांगे-पाटलांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला आल्यापावली परतावे लागले. जरांगे-पाटील यांचे हे चौथे उपोषण असून, या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांसह विविध संघटना अंतरवाली सराटीत येत आहेत. जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या भागातील  ४० पीएच.डी चे विद्यार्थी आले असून, मागच्या अठरा महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्याने सारथीचे विद्यार्थीही जरांगे-पाटील यांच्यासोबत अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. काही दिवसांपूर्वी सारथीच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील