शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षीय मुलगी गर्भवती, गर्भपातास उच्च न्यायालयाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:35 IST

सत्तावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १६ वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. नकार देताना उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या पॅनेलने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत म्हटले की

मुंबई : सत्तावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १६ वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. नकार देताना उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या पॅनेलने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत म्हटले की, गर्भपाताला परवानगी दिल्यास मुलीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.मुलीचा गर्भपात करण्यास परवानगी देण्यासाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे होती.गुरुवारी आठ डॉक्टरांच्या पॅनेलने मुलीच्या तब्येतीची तपासणी केली. पॅनेलमध्ये केईएम रुग्णालय व जी.एस. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा समावेश होता. आता या टप्प्यावर मुलीचा गर्भपात केला तर तिच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकेल, असे डॉक्टरांच्या पॅनेलने अहवालात म्हटले आहे. तर मुलीच्या वडिलांनी मुलीचा गर्भपात करून दिला नाही तर तिच्या जिवाला धोका निर्माण होईल व तिची मानसिक स्थितीही बिघडेल, असे याचिकेत म्हटले आहे.‘मुलगी अशक्त असल्याने तिची तब्येत वारंवार बिघडते. त्यातच बलात्कारामुळे आलेले गर्भारपण व त्यातून जन्माला आलेले मूल वाढविणे, हे मुलीच्या मानसिक आरोग्यासाठीही धोकायदायक आहे. सन्मानाने आयुष्य जगणे, हा मुलीला घटनेने बहाल केलेला अधिकार आहे. इच्छा नसतानाही एका अल्पवयीन मुलीवर हे गर्भारपण लादण्यात येत आहे, तिच्या अधिकाराचा भंग करण्यात येत आहे,’ असा युक्तिवाद वडिलांच्या वकिलांनी न्यायालयात केला.मात्र, न्यायालयाने मेडिकल बोर्डाच्या मताच्या विरुद्ध जाण्यास नकार दिला आहे. मेडिकल बोर्डाचे मत दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. ‘कायद्यानुसार, २० आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्यास मनाई आहे. केवळ अपवादात्मक स्थितीतच परवानगी दिली जाऊ शकते,’ असे खंडपीठाने म्हटले.मुलीने गर्भपात केला तर तिच्या जिवाला धोका आहे. या धोक्याकडे डोळेझाक करता येणार नाही. शिवाय ही अल्पवयीन मुलगी बाळाला जन्म देऊ शकते, असा निष्कर्ष डॉक्टरांच्या पॅनेलने काढला आहे, असे न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीदरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलांना सांगितले.कायदेशीररीत्या अल्पवयीन मुलीला किंवा तिच्या पालकांना मुलाला वाढविण्याची इच्छा नसेल तर त्यांना जबरदस्ती करता येणार नाही. मुलगी किंवा तिचे पालक हे त्या मुलाला दत्तक देऊ शकतात, अशी सूचनाही मेडिकल बोर्डाने अहवालात केली आहे.तक्रारीनुसार, आॅगस्टमध्ये मुलीच्या कुटुंबीयांनी एका स्थानिक डिलिव्हरी बॉयविरुद्ध ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या मुलाने अल्पवयीन पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तो फरार झाला. मात्र, त्यानंतर मुलीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलगी गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.पीडितेचा गर्भ २७ आठवड्यांचा आहे. पीडितेच्या प्रकृतीचा विचार करत तिला वैद्यकीय व मानसिक आधार देऊन गर्भधारणा सुरू ठेवण्याचा सल्ला देणे योग्य असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.त्या मुलीला कमी प्रमाणात अ‍ॅनिमिया आहे, मात्र तो उपचारांती बरा होऊ शकतो. तसेच, वजनाप्रमाणे बाळ जगण्याची शक्यताही ८० टक्के आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रसूतीनंतर कुटुंबाची इच्छा असल्यास योग्य प्रक्रियेअंती बाळ दत्तक देता येईल, अशी सूचना मेडिकल बोर्डाने दिली असल्याची माहिती डॉ. सुपे यांनी दिली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टAbortionगर्भपात