शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मराठा समाजाला मिळणार १६ टक्के स्वतंत्र आरक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 05:45 IST

विधेयक २९ नोव्हेंबरला विधिमंडळात मांडणार

मुंबई : मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्गात १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीने जवळपास घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आरक्षणाची तरतूद असलेले विधेयक २९ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणावरून विरोधक राजकारण करीत असून राजकारणाला राजकारणानेच उत्तर दिले जाईल, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावले.

मराठा, धनगर आरक्षणाचा अहवाल मांडण्यावरून विरोधकांनी चालविलेल्या गोंधळातच मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणारच ही आमची कमिटमेंट आहे. विरोधकांच्या मनात मात्र काळंबेरं आहे. त्यांना समाजा-समाजात तेढ निर्माण करायची आहे. आम्ही मराठा आरक्षणाचे विधेयक तर मांडूच पण राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सरकारचा कृती अहवालही (एटीआर) आम्ही मांडू.

आज अहवालाची मागणी करीत असलेल्या विरोधकांनी आयोगाचे ५१ अहवाल आतापर्यंत सभागृहात का मांडले गेले नाहीत याचा जाब द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. एकत्रिपणे निर्णय घेऊयात. माझी हात जोडून विनंती आहे की, तुम्ही समाजविघातक राजकारण करू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ओबीसींसह असलेल्या ५२ टक्के आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. गोवारी समाजाला ओबीसींमध्ये नाही तर स्वतंत्रपणेच आरक्षण दिले आहे. मुस्लिम समाजाकडे काँग्रेस-राष्ट्रवादी हे व्होट बँक म्हणूनच पाहत आले आहेत. सवलती आम्ही दिल्या. मुस्लिम समाजाचा एवढाच कळवळा असेल तर सच्चर, रंगनाथन समितीच्या अहवालानंतर या समाजाला तुम्ही आरक्षण का दिले नाही असा सवाल त्यांनी केला.

भाजपा-शिवसेना सदस्यांनी पुढचे तीन दिवस दोन्ही सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहावे, असा व्हिप आज काढण्यात आला.मराठा, धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल सभागृहात मांडण्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सरकारच्या मनात पाप असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. तर सरकार अहवाल मांडत का नाही, त्यात लपविण्यासारखे आहे तरी काय, असा सवाल अजित पवार यांनी केला.शिवसेनेचा पाठिंबामराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत सरकार आणत असलेल्या विधेयकाबाबतची माहिती त्यांनी ठाकरे यांना दिली, असे सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत आश्वासन दिल्याची माहिती पाटील यांनी दिली. मराठा समाज बांधवांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका. मराठा आरक्षण टिकणारे पक्के विधेयक बनवा. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी. इतर वर्गाला धक्का न लावता आरक्षण विधेयक आणावे तसेच धनगर आणि इतर समाजाच्या न्याय मागण्यांसाठीही केंद्राकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण