शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वेतननिश्चितीपासून १५० अधिकारी वंचित; एसटी महामंडळातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 05:24 IST

कमी पगारात करावे लागते काम; परिवहनमंत्र्यांकडे मागितली दाद

मुंबई :  एस.टी. प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे एस.टी.तील सुमारे १५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना फटका बसला असून, त्यांना हक्काच्या वेतननिश्चितीपासून वंचित राहावे लागले आहे. याबाबतीत अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली. सन २०१६ पासून सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या व नियमित बढतीस पात्र ठरलेल्या अनेक अधिकाऱ्यांना वेतननिश्चिती मिळाली नाही. या अधिकाऱ्यांचे स्थायीकरण होऊन तीन वर्षे उलटली आहेत. मात्र  तरीही  एसटी प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांची वेतननिश्चिती न केल्याने गेली सात वर्षे हे अधिकारी कमी पगारात काम करीत आहेत. सन २०१६-२० च्या करारातील वेतनवाढ, नियमितपणे वाढलेले महागाई, घरभाडे व इतर पूरक भत्तेदेखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले नाहीत.  कोणताही कर्मचारी प्रशिक्षण व परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण करून नियमित पदामध्ये स्थायी होतो, तेव्हा त्याचे वेतन सुधारित पद्धतीने निश्चित केले जाते. पण १५० अधिकाऱ्यांचा वेतननिश्चिती प्रस्ताव रेंगाळलेला आहे.  पुन्हा संपासाठी अफवांची पेरणी७४ दिवस संपावर असलेल्या आणि कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपात सहभागी व्हावे, यासाठी काही व्यक्तीची अफवांची पेरणी सुरू आहे. याबाबतचे विविध मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने पुन्हा आवाहन करत ज्यांच्यावर कारवाई झालेली नाही, त्यांनी अफवांना बळी न पडता कामावर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.   जे कर्मचारी कामावर रुजू आहेत. त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच नाही. संपकरी कर्मचाऱ्यांवरच कारवाई होणार आहे. बहुसंख्य कर्मचारी असे आहेत, की ज्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पण ते संपात सहभागी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अफवांना बळी न पडता कामावर रुजू व्हावे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे शेखर चन्ने यांनी सांगितले.१५० अधिकाऱ्यांची वेतननिश्चिती बाकी आहे, त्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय येणार आहे. लवकरच त्यावर निर्णय घेण्यात  येणार असून, त्या अधिकाऱ्यांना नवीन कराराप्रमाणे वेतन मिळेल.  - शेखर चन्ने,     उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एस.टी. महामंडळ३६० कर्मचारी बडतर्फ महामंडळाने मंगळवारी ३६० कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून एकूण संख्या ४२२२ इतकी झाली. तर ११०२४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून ६२९५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

टॅग्स :state transportएसटी