शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

देशात १५० लाख टन साखर राहणार शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:40 IST

सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे.

पुणे : सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. राज्यात ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असे सांगण्यात येत आहे. देशातील साखरेचे उत्पादन ३२२ लाख टनांवर पोहचले आहे.गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे देशात तब्बल १०७ लाख टन साखर शिल्लक होती. यंदाही ३२० लाख टनांवर उत्पादन पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही राज्यात १०७ लाख २० हजार टन साखर उत्पादित झाली होती. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर २०१८मध्ये तब्बल ५३.३६ लाख टन साखर राज्यात शिल्लक होती. यंदाच्या हंगामातही राज्यात १०७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. परिणामी तब्बल ६० लाख टन साखर शिल्लक राहील.उत्तरप्रदेशात एप्रिल अखेरीस तब्बल ११२.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. येथील ११९ पैकी ६८ कारखाने सुरू होते. त्यामुळे येथील साखर उत्पादनात आणखी वाढ होईल. उत्तर प्रदेशापाठोपाठ दुसºया क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. कर्नाटकातील हंगामही संपला असून, येथे ३२.२० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये ११.१९, तमिळनाडू ७.०५, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा ७.६०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ५.३०, बिहार, पंजाब आणि हरयाणात अनुक्रमे ८.३५, ७.७० आाणि ६.७५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.यंदा ३0 लाख टनांची निर्यातयंदा देशात ३३० लाख टन साखर उत्पादन होईल. देशांतर्गत साखरेचा खप २६० लाख टन असून, निर्यात ३० लाख टनांची होईल. यावर्षीचा आणि गतवर्षीचा शिल्लक साठ्यामुळे यंदाही १४७ लाख टन साखर शिल्लक राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagricultureशेती