शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 15% लसीकरण खासगी रुग्णालयात; पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमाण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 10:02 IST

राज्यात झालेल्या एकूण सात कोटी लसीकरणापैकी १ कोटी ३ लाख लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाले आहे.

मुंबई : राज्यात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणात १५ टक्के लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यात सर्वाधिक प्रमाण पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील असून हे लसीकरण सशुल्क पद्धतीचे आहे. या तीन शहरांत ८५ टक्के लसीकरण खासगी क्षेत्रातील आहे.

खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसींचा साठा अधिक असल्यामुळे लसीचा तुटवडा भासत नाही. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ९८ लाख लसींच्या डोसपैकी ६५ लाख कोविशिल्ड आणि ३३ लाख कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले. त्यातील ७० टक्के डोस हे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात देण्यात आले. त्यात ४० लाख कोविशिल्ड आणि २९ लाख कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. तर गोदरेज रुग्णालयाने ३ लाख लसींचे डोस, जसलोक आणि नानावटी रुग्णालयाने प्रत्येकी अडीच लाख लसींचे डोस देण्यात आले. सूर्या रुग्णालयात १ लाख लसींचे डोस दिले आहेत. शहर, उपगरातील अन्य १७० रुग्णालयांना केवळ काही हजारांत लसींचा डोससाठा प्राप्त झाला आहे.

राज्यात झालेल्या एकूण सात कोटी लसीकरणापैकी १ कोटी ३ लाख लसीकरण हे खासगी क्षेत्रात झाले आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील दोन तृतीयांश जिल्ह्यांत सशुल्क लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईत ४३ लाख, पुण्यात २७ लाख, ठाण्यात १७ लाख लसींचे डोस खासगी क्षेत्रातील आहेत. त्यानंतर रायगड ३.३४ लाख, औरंगाबाद २.४१ लाख, नागपूर १.४६ लाख आणि कोल्हापूरमध्ये १.७ लाख लसींचे डोस खासगी क्षेत्रातील आहेत. 

तरुणांचे ८० टक्के लसीकरण मुंबईत तरुण लाभार्थ्यांचे ८० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, यातील ४३ टक्के लाभार्थ्यांनी खासगी क्षेत्राला पसंती दिली आहे. याखेरीज, नांदेडमध्ये ३० टक्के, हिंगोली ३३ टक्के आणि नंदुरबारमध्ये ३६ टक्के सशुल्क लसीकरण पार पडले आहे.

राज्यात ११ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस- राज्यात बुधवारी ११ लाख ८ हजार ३१४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ७ कोटी ६१ लाख ६५ हजार ७६२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 

- राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २ कोटी ७४ लाख ५२ हजार ८१५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ५४ लाख ८१ हजार ७९८  लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या २ कोटी ३४ लाख ७२ हजार ७८३ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ३५ लाख  ५८ हजार २०१ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस