शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

१४०४ शाळांवर कारवाई; सर्वाधिक बोगस पटपडताळणी धुळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 00:04 IST

राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे. या शाळांनी कागदोपत्री जास्त विद्यार्थी संख्या दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक आदींवर फौजदारीच्या कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश आहेत. मात्र, अंमलबजावणीस विलंब होत असल्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत.सुमारे सात वर्षांपूर्वी महसूल विभागाने खोटी पटसंख्या नोंदविणाºया शाळांची पटपडताळणी केली आहे. राज्यभरातील ३५ जिल्ह्यांमधील शाळांत ती सलग तीन दिवस करण्यात आली. यातून एक हजार ४०४ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बोगस पटसंख्या नोंदविल्याचे निदर्शनात आहे. राज्यभरातून केवळ दीड लाख विद्यार्थी बोगस असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही विद्यार्थी संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.या पटपडताळणीमध्ये राज्यभरातील एक हजार ४०४ शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटसंख्या आढळली. त्यामधील विद्यार्थी संख्या दीड लाखापेक्षा नक्कीच जास्त असण्याची शक्यता आहे. खोटी पटसंख्या नोंदविणाºया राज्यात सर्वाधिक धुळे जिल्ह्यात सुमारे ३९४ शाळा आढळल्या. यात जिल्हा परिषदेच्या १७ शाळा आहेत. याखालोखाल नांदेड जिल्ह्यात १७७ शाळा असून त्यात २७ जिल्हा परिषदेच्या आहेत. तर, जळगाव जिल्ह्यातील ११८ शाळांमध्ये जि.प.च्यादेखील १७ शाळा आहेत. नागपूरला १२७ शाळा असून त्यात जि.प.च्या १४ आहेत. सोलापूरच्या ११५ शाळांमध्ये जि.प.च्यादेखील नऊ, तर रायगडमधील ११८ शाळा असून आठ जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र शंभरपेक्षा कमी शाळांचा समावेश असून त्यातही महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि आश्रमशाळांचा व अनुदानित-विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांचा समावेश आहे.खोटी विद्यार्थी पटसंख्या नोंदवलेल्या ३५ जिल्ह्यांमधील शाळांची संख्याजिल्हा शाळाठाणे ७५रायगड ११०कोल्हापूर ००५सांगली ००७सातारा ०११रत्नागिरी ००७सिंधुदुर्ग ००९लातूर ०७१नांदेड १७७उस्मानाबाद ०१४औरंगाबाद ०५५बीड ०३८हिंगोली ००६जालना ०३०परभणी ०५७सोलापूर ११५नंदुरबार ०४८धुळे ३९४जळगाव ११८नाशिक ०३३बुलडाणा ०१५यवतमाळ ०२३भंडारा ०१३गोंदिया ०१३वर्धा ००८नगर ०१३चंद्रपूर ०४२पुणे ०३२वाशिम ०१२अमरावती ०२३अकोला ०२२मुंबई ०५२नागपूर १२७गडचिरोली ०३७पालघर ००३- राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांची पडताळणी झाली. त्यातील२० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांमध्ये सुमारे १० टक्के विद्यार्थ्यांची नोंद बोगस असल्याचे उघड झाले.- पालघर जिल्ह्यात केवळ तीन शाळा, तर ठाण्यामध्ये सुमारे ७५ शाळा बोगस विद्यार्थी पटसंख्या नोंदविणाºया असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा