शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 'ब्लू व्हेल' गेमच्या नादात 14 वर्षीय मुलाची आत्महत्या ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 19:32 IST

उपनगरात अंधेरी इथे रहाणा-या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने शनिवारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

ठळक मुद्देएका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने शनिवारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. अंधेरी पोलीस या मुलाच्या आत्महत्येमागच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.ब्लू व्हेल या खेळाची सुरुवात रशियामधूनच झाली आहे.

मुंबई, दि. 31 - उपनगरात अंधेरी इथे रहाणा-या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने शनिवारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. 'ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमच्या नादात मुलाने आत्महत्या केल्याची माहिती इंडिया टुडेने मुंबई पोलीस दलातील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. सदर मुलाला ब्लू व्हेल या ऑनलाइन गेमचे व्यसन जडले होते. रशिया आणि अन्य देशांमध्येही काही जणांना या गेमच्या नादात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

अंधेरी पोलीस या मुलाच्या आत्महत्येमागच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. 9 व्या इयत्तेत शिकणारा हा मुलगा अंधेरीतील एका आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये शिकत होता. त्याला आई-वडिल आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आत्महत्या करणा-या मुलाला पायलट बनण्याची इच्छा होती. प्रशिक्षणासाठी रशियाला जाण्याचीही इच्छा त्याने व्यक्त केली होती. महत्वाचे म्हणजे ब्लू व्हेल या खेळाची सुरुवात रशियामधूनच झाली आहे.

शेजारच्या इमारतीत रहाणा-या लोकांनी शनिवारी या मुलाला इमारतीच्या गच्चीवर पाहिले होते. त्यावेळी तो स्वत:चा सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत होता. अंधेरी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे. ही आत्महत्या ब्लू व्हेल या खेळामुळे झाली कि, अन्य कारणामुळे ते पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. पालक अजूनही या आत्महत्येबद्दल बोलायला तयार नाहीत. त्यांना धक्का बसला आहे. आम्ही सर्व अंगांनी तपास करत आहोत असे या प्रकरणाचा तपास करणा-या अधिका-याने सांगितले. 

काय आहे ब्लू व्हेल ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून, रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा खेळ बनवणा-या रशियन पोलिसांनी वर्षाच्या सुरुवातीला अटक केली होती. हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते. प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो. एक टप्पा पार केल्यानंतर पुरावा द्यावा लागतो नंतर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरता.