शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

रूपी बँकेत पाच लाख खातेदारांचे अडकले तेराशे कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 12:37 IST

आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने फेब्रुवारी २०१३ रोजी रूपी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले..

ठळक मुद्देठेवीदार-खातेदारांच्या वैद्यकीय, शिक्षण आणि लग्न यांसारख्या कारणांसाठी पैसे काढण्याची मुभा

पिंपरी : रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव गेल्या आठ महिन्यांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) पडून आहे. या विलीनीकरण प्रस्तावाबाबत आरबीआयने कोणताही निर्णय न घेतल्याने राज्यातील तब्बल पाच लाख खातेदार-ठेवीदारांचे १२९० कोटी रुपये बँकेत अडकले आहेत.        आर्थिक अनियमिततेमुळे आरबीआयने फेब्रुवारी २०१३ रोजी रूपी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळे खातेदारांना खात्यातून पैसे काढण्यास निर्बंध घातले आहेत. यापूर्वी काही राष्ट्रीय आणि काही शेड्युल्ड बँकांनी रूपी बँकेचे विलीनीकरण करून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, कोणताही प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रूपी बँकेची आर्थिक पडताळणी केली. त्यानंतर आरबीआयच्या सूचनेनुसार विलीनीकरणाबाबत रूपी आणि राज्य सहकारी बँकेचा संयुक्त प्रस्तावदेखील पाठविला. त्यात विलिनीकरण करून घेणाऱ्या राज्य बँकेवर फारसा बोजा पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.         नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर बँक फॉर रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) बँकेमार्फत राज्य बँकेला पतपुरवठा होत असल्याने त्यांना बँकांच्या स्थितीची पाहणी करण्याची सूचना आरबीआयने केली. नाबार्डची तपासणीही पूर्ण झाली. त्यानंतरही विलीनीकरणाच्या अहवालावर कोणताही निर्णय आरबीआयने घेतला नाही. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले,'आरबीआय'कडे १७ जानेवारी रोजी विलीनीकरणाचा संयुक्त प्रस्ताव दिला आहे. आतापर्यंत त्यावर निर्णय होणे अपेक्षित होते. या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती आरबीआयकडे केली आहे.'' जानेवारी महिन्यापासून या प्रकरणाचा आरबीआयकडे पाठपुरावा केला जात आहे. 

हार्डशिपअंतर्गत साडेतीनशे कोटी वितरितआर्थिक निबंर्धामुळे खात्यातील रक्कम काढण्यावर निर्बंध आहेत. मात्र, ठेवीदार-खातेदारांच्या घरातील वैद्यकीय, शिक्षण आणि लग्न यांसारख्या कारणांसाठी हार्डशिप अंतर्गत पैसे काढण्याची मुभा दिली जाते. त्या अंतर्गत ९०,२११ ठेवीदारांना ३५६ कोटी ६२ लाख रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती रूपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी दिली.  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRupee Bankरुपी बँकMONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक