शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरती शुल्कातून 127 कोटी तिजोरीत; ४,६४४ जागांसाठी १३ लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:02 IST

तलाठी भरतीसाठी पीएचडीधारक, इंजिनिअर, एमबीए झालेल्या उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. यावरून राज्यात किती बेरोजगारी आहे, याचाही पुरेसा अंदाज येतो.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ४,६४४ पदांच्या तलाठी भरतीतून परीक्षा शुल्कापोटी तब्बल १२७ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. या परीक्षेसाठी १३ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, या बेरोजगार उमेदवारांकडून शासनाने अवैधरीत्या दुप्पट शुल्क वसूल केल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला असून, वसूल केलेले वाढीव शुल्क परत करण्याची मागणी केली आहे.

तलाठी भरतीत खुल्या वर्गासाठी १ हजार रुपये, तर आरक्षित वर्गासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले. यात उल्लंघन झाल्याचा आरोप  आ. किशोर जोरगेवार यांनी केला आहे.

उच्चशिक्षितांचेही अर्ज तलाठी भरतीसाठी पीएचडीधारक, इंजिनिअर, एमबीए झालेल्या उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. यावरून राज्यात किती बेरोजगारी आहे, याचाही पुरेसा अंदाज येतो.

तलाठी भरतीसाठी एवढे शुल्क का? केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ३५० रुपये, तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परीक्षेसाठी ९०० ते १ हजार रुपये शुल्क का आकारते? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. 

२०२२ चा जीआर काय सांगतो? नोव्हेंबर २०२२च्या जीआरनुसार एखाद्या शासकीय भरती परीक्षेत ५ लाखापेक्षा जास्त उमेदवार सहभागी होत असतील तर परीक्षा शुल्क ४९५ रुपये आणि १५ टक्के प्रशासकीय कार्यालयाचा खर्च असे ५५० रुपये आकारले जावेत. मात्र, तलाठी भरतीत १३ लाख अर्ज आले असतानाही जादा शुल्क आकारण्यात आले असून, ते शासनाने परत करावे, अशी मागणी जोरगेवार यांनी नुकतीच विधानसभेत केली आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारjobनोकरी