शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 06:26 IST

प्रवेश प्रक्रियेचा ५ जूनला शेवटचा दिवस असल्याने तक्रारदार विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अकरावीसाठी ४ जूनपर्यंत १२ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये मुंबई विभागात १ लाख १९ हजार ५९२ जणांची नोंदणी झाली आहे. मुंबईत १,१९,५९२ नोंदणी शिक्षण विभागाची सॉफ्टवेअर प्रणाली सुरळीत होत असली तर काही ठिकाणी अजूनही अडचणींची नोंद झाली आहे. त्यात मुंबई विभागातील सीबीएसईच्या रिपिटर विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान, आता १७ हजारपैकी फक्त ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती शिक्षण विभाग संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली. प्रवेश प्रक्रियेचा ५ जूनला शेवटचा दिवस असल्याने तक्रारदार विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

रिपिटर म्हणून पास झालेल्या एसएससी आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना योग्य पर्याय उपलब्ध होत नाही आणि तसेच त्यांच्या मोबाईलवर ओटीपीही येत नाही, अशा तक्रारी आता केल्या जात आहेत. या तक्रारीच्या निवारणासाठी चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचाऱ्यांकडे प्रशासकीय अधिकार नसल्याने ती अडचण दूर झालेली नाही.

राज्यातील ९०० तक्रारी प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के तक्रारी सोडविणे हे आमचे काम आहे, ते काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.- श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभाग

  • अर्ज लॉक केलेले     ११,२०,३७२
  • नियमित फेरी    १०,७३६६
  • इन हाऊस कोटा    ५३१६० 
  • व्यवस्थापन कोटा    २६,५८६ 
  • अल्पसंख्याक कोटा    ४१,०००
टॅग्स :collegeमहाविद्यालयAdmissionप्रवेश प्रक्रियाStudentविद्यार्थी