शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

१२ वर्षाच्या मुस्लीम मुलीने मारली भगवद् गीतेवरील स्पर्धेत बाजी

By admin | Updated: April 3, 2015 13:57 IST

मुंबईत राहणा-या १२ वर्षाच्या मरियम सिद्दीकी या मुलीने इस्कॉनतर्फे आयोजित भगवद् गीता स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ३ -  मुंबईत राहणा-या १२ वर्षाच्या मरियम सिद्दीकी या मुलीने इस्कॉनतर्फे आयोजित भगवद् गीता स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. सहावीत शिकणा-या मरियमने सुमारे ३ हजारहून अधिक स्पर्धकांना मागे टाकून स्पर्धेत बाजी मारली आहे.  एकीकडे देशात घरवापसी सारख्या मोहीम राबवत देशाच्या ऐक्यात बाधा आणण्याचे उद्योग काही मंडळीकडून सुरु असताना मरियम भगवद् गीतेवरील स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावून एकतेचे संदेशच दिला आहे.  
इस्कॉनतर्फे यंदा 'गीता चॅम्पियन्स लीग' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात गीतेवर आधारीत १०० मार्कांचे प्रश्न विचारण्यात आले होते.  या स्पर्धेच्या निमित्ताने भगवद् गीतेचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने मी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे मरियम सांगते. मरियमच्या या निर्णयाला तिच्या आईवडिलांनीही पाठिंबा दिला. मरियम सध्या मीरा रोडमधील कॉस्मोपॉलिटन हायस्कूलमध्ये शिकते.मला धर्मांचा अभ्यास करायला आवडतो व फावल्या वेळेत मी विविध धर्मांवरील पुस्तकांचे वाचन करते असे मरियम नमूद करते. परीक्षेपूर्वी मी भगवद् गीतेचा अभ्यास केला, गीतेतून आपल्याला काय शिकायला मिळते हे मी समजून घेतले व मगच स्पर्धेत उतरल्याचे मरियम आत्मविश्वासाने सांगते.  एका मुस्लिम मुलीने भगवद् गीतेवरील स्पर्धेत बाजी मारल्याने शाळेतील शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आमच्या कुटुंबाने कधीच धर्मात भेदभाव केला नाही. सर्व धर्म समान आहेत, प्रत्येक व्यक्तीने सर्व धर्मांचा आदर करावा व त्या धर्मांचा स्वीकारही करावा असे मरियमचे वडिल फारुख सिद्दीकी यांनी सांगितले. कोणत्याही धर्मात हिंसा किंवा द्वेष करणे शिकवले जात नाही. दुर्दैवाने आपल्याकडे काही जण असा चुकीचा संदेश पसरवतात असे फारुख यांनी स्पष्ट केले. या सर्व गोष्टींचा आपल्या मुलांवर चुकीचा परिणाम होण्यापूर्वी पालकांनी मुलांशी संवाद साधून काय चुकीचे आहे हे मुलांना समजवावे असा सल्लाही त्यांनी अन्य पालकांना दिला.