शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे १२ नेते फुटीच्या मार्गावर?; शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 16:44 IST

१५ वर्षाला आषाढीला कुणीही येण्याची गरज नाही. शिंदे-फडणवीस आषाढी, कार्तिकीची पूजा करतील असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

सोलापूर - राज्यातील १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीमागे उभे आहे. सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात चांगले काम करताना दिसतायेत. प्रत्येकाला निधी मिळतोय हे लोकांना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नेते फुटले आहेत, फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. सोलापूर जिल्ह्यातीलही मोठा नेता त्यात आहे. सर्व ठरलंय, जरा थांबा असं म्हणत शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी मोठा दावा केला आहे. 

शहाजी पाटील म्हणाले की, सरकार पाडण्याची भाकीतं अनेकदा केली आहेत. ९५ साली मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी ५ वर्ष शरद पवार आम्हाला सांगायचे पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. परंतु मनोहर जोशी, नारायण राणेंचे सरकार काही पडले नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आताही सरकार पडणार असं विधानं करून यांच्या पक्षातील नेते भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना यात येणार आहेत त्यांना अडवण्यासाठी भीती निर्माण करत आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत १५ वर्षाला आषाढीला कुणीही येण्याची गरज नाही. शिंदे-फडणवीस आषाढी, कार्तिकीची पूजा करतील. सुषमा अंधारे यांनी विधाने मतभेद करणारी आहेत. त्यांच्यावर फारसं बोलण्यासारखं नाही. उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून काम करता आले नाही. त्यामुळे आमदारांमध्ये असंतोष पसरला. प्रत्येक आमदार, नेता स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. अजित पवार हे मोठे राजकारणी, ९५ साली कुठे गेले होते. त्यावेळी सरकार पडले नाही. शिवसेना-भाजपा मिळून १०० जागा नव्हत्या. आता १७० जागा आहेत. त्या पाडायला निघाल्यात. त्यांच्या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळला दावाजयंत पाटील जे बोलले असतील ते तर्कशुद्ध आणि अभ्यास करून बोलतात. आमच्या पक्षाबद्दल काही अफवा पसरवल्या जातात. तसला कुठलाही प्रकार नाही. आमचे सर्व एकत्र आहोत. घट्ट आहोत आणि एकजीवाने काम करतोय असं सांगत राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनी शहाजीबापू पाटलांचा दावा फेटाळून लावला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस