विक्रमगड/तलवाडा: विक्रमगडमधील माण आश्रमशाळेत ५३९ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असून यातील विद्यार्थ्यांच्या सोई-सुविधाकरीता एम़ ओ़ एल़ आय़ पी़ एस़ अंधेरी, मुंबई (मरोळ) यांनी पुढाकार घेऊन विदयार्थ्याकरीता १२ बाथरुम पाणी योजनेसह व भव्य भोजन शेड बांधून दिली आहे़ यापूर्वीही त्यांनी खेळाचे साहित्य, खाऊ वाटप करुन आश्रमशाळेला मदत केली आहे.या कार्यक्रमांच्या वेळी आशिष रजपूत डायरेक्टर (एम़ ओ़ एल़ आय़ पी़ एस़) अभय गरदे, जनरल मॅनेजर हयूमन रिसोर्स अॅडमिनीस्ट्रेशन, अगम सक्सेना, जनरल मॅनेजर मुंबई, देवी प्रकाश यादव जनरल मॅनेजर आय टी तसेच विक्रमगडचे पोलिस निरिक्षक नंदवाळकर, संस्थेचे पदाधिकारी, सहकारी व ग्रामस्थ यांची उपस्थित होती़ अशा सहकार्यातून विद्यार्थ्याची व त्याचबरोबर आश्रमशाळेचीही प्रगती होत असल्याचे मुख्याध्यापकांनी याप्रसंगी सांगीतले़ यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढाव घेण्यात आला. (वार्ताहर)
माण आश्रमशाळेसाठी १२ बाथरुम
By admin | Updated: April 29, 2016 04:47 IST