शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

"१२-१२ जागा घ्याव्यात म्हणजे आम्हाला १२ वाजवता येतील", रामदास आठवलेंचा महाविकास आघाडीला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 16:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला.

सांगली :  राज्यात वंचितने १२-१२ जागांचा प्रस्ताव दिला आहे, हा प्रस्ताव चांगला आहे, त्यामुळे चारही पक्षांनी १२-१२ जागा घ्याव्यात, म्हणजे आम्हाला त्यांचे १२ वाजवता येतील, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सर्व पैलवान एकत्र आले आहेत. मात्र, सर्व पैलवानांना आम्ही चितपट करू, असा इशारा सुद्धा रामदास आठवले यांनी दिला. ते सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

प्रकाश आंबडेकर सक्षम नेते आहेत, ते महायुतीसोबत येणार नाहीत. पण ते महाविकास आघाडीत जाणार आहेत, 12 जागांचा प्रकाश आंबेडकर यांचा मविआला प्रस्ताव आहे. त्या जागा त्यांना द्यावात म्हणजे आम्हाला त्याचे बारा वाजवणे सोपे जाईल. बाबासाहेब आंबडेकर यांनी काढलेल्या पक्षाचे अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार आहे, त्यांनी त्याचा पक्ष विसर्जित करून आरपीआयमध्ये यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. 

मराठा समाजातील गरीब घटकाला आरक्षण मिळायलाच हवे. ज्यांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा घटकाचा यासाठी विचार व्हावा. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. सरकार त्यावर सध्या कामही करत आहे. हे आरक्षण देताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून न घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण दिल्यासही तोडगा मिळू शकतो, असे रामदास आठवले म्हणाले.

याचबरोबर, सध्या सुरू असलेला ओबीसी-मराठा वादही मिटणे आवश्यक आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातीलही मतभेद मिटवले, तर आरक्षणाच्या मागणीवर सरकारला काम करता येणार आहे. २० जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत. मात्र, ती वेळ येणार नाही. त्या अगोदरच शासन यावर निर्णय घेईल. मराठा समाजातील गरिबांना आरक्षणासाठी स्वतंत्र १५ टक्क्यांचे आरक्षण देण्याबाबतही विचार करण्यात येईल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

शरद पवार यांना अजित पवार यांनी निवृत्ती घेण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून रामदास आठवले यांनी भाष्य केले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने आता लगेच शरद पवार निवृत्ती घेतील, असे वाटत नाही. तसेच, अजित पवार आता लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही, आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु आहे, असे रामदास आठवले म्हणाले. याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रमध्येच गरज असून दिल्लीत फडणवीस यांनी येण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. शिर्डीमधून निवडणूक लढवू इच्छित असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSangliसांगली