शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'या' जिल्ह्यात महिन्याभरात ११८ बालकांचा मृत्यू; तरीही प्रशासनाला जाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:30 IST

सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. हा मृत्यूदर राज्याच्या सरासरी दरापेक्षा दुप्पट असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात शून्य ते २८ दिवसांचे ३७, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ३८, एक वर्ष ते पाच वर्षे वयोगटातील २० आणि उपजत २३ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सहा मातांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात एकीकडे शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा मृत्यूदर सरासरी हजारी २१ आहे. मात्र, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात या प्रमाणानुसार मृत्यूदर दुप्पट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मृत्यू झालेल्या बालकांमध्ये नवापूर बालविकास प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे २२ बालकांचा मृत्यू झाला आहे, तर तोरणमाळ प्रकल्पात १६, अक्कलकुवा प्रकल्पात १५ बालकांचा मृत्यू झाला आहे.कुपोषित बालकांची संख्या कागदावरच घटवली जात असल्याची ओरड नेहमीचीच आहे. सर्वेक्षण होते तेव्हा बालकांची संख्या वाढते. ती दर महिन्याला कमी होत जाते. असा प्रकार आता पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यपालांच्या दत्तक गावातच तक्रारराज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी (ता. अक्कलकुवा) गावात चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका येत नसल्याची, तसेच पोषण आहारही वितरित झाला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. आरोग्य तपासणीच्या वेळेसही त्या अनुपस्थित असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भातील चौकशीसाठी स्थानिक अधिकारी गावात जाऊनही कुठलीही कार्यवाही झाली नाही.