शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात १६५ दिवसांत आयएएसच्या ११७ बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:46 IST

परदेशी, मुंढेंची बदली ठरली लक्षवेधी : एकाच अधिकाऱ्याच्या तीन-तीन बदल्या

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कोरोनाच्या महामारीतही सपाटा लावल्याची आकडेवारी समोर आली आहे. ७ एप्रिल ते १८ सप्टेंबर या १६५ दिवसांमध्ये आयएएसच्या तब्बल ११७ बदल्या करण्यात आल्या.

७ एप्रिलपासून बदल्यांचा धडाका सुरू झाला. १८ सप्टेंबरपर्यंत तो सुरू होता. यात एका अधिकाºयाची दोन किंवा तीन वेळा बदली झाल्याचीदेखील उदाहरणे आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आदी अधिकाºयांच्या बदल्या लक्षवेधी ठरल्या.

लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्य शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाºयांच्या बदल्यांना सुरुवातीला एक वर्ष स्थगिती देण्यात आली होती. नंतर ती उठवून केवळ १५ टक्के बदल्यांना अनुमती देण्यात आली. बदल्यांचा आर्थिक भार येतो हे कारण दिले गेले. आयएएस अधिकाºयांच्या बदल्यांना कुठलीही स्थगिती नव्हती हे खरे असले तरी, कोरोनाच्या संकटकाळात त्या-त्या प्रशासकीय व्यवस्थेचे प्रमुख असलेल्या आयएएस अधिकाºयांच्या इतक्या बदल्या कराव्यात का, असा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. एवढ्या बदल्या केल्यानंतरही अजून जवळपास दीड डझन अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि सहा अधिकारी पोस्टिंग बदलण्यासाठी धडपडत आहेत.

तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेतून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग; मंत्रालय येथे बदली झाली होती, पण ती रद्द करण्यात आली. आता ते नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. विनिता वेद-सिंघल या फिल्मसिटीच्या संचालक होत्या, त्यांची बदली आधी आदिवासी विकास विभागाच्या सचिव तर तीनच महिन्यांत त्यांची बदली कामगार सचिव म्हणून करण्यात आली.

दीपा मुधोळ-मुंडे उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी होत्या, त्यांची बदली आधी लातूर महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली, पण लगेच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आणि त्यानंतर लगेच त्यांची बदली प्रशासक; सिडको औरंगाबाद या पदावर झाली. किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम खात्यात सचिव म्हणून केली गेली आणि दोनच दिवसांत ती रद्द करून त्यांना मदत व पुनर्वसन विभागातच कायम ठेवण्यात आले.अनुपकुमार यादव यांची राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालक पदावरून बदली करून त्यांना विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून २३ जुलैला पाठविले आणि १३ आॅगस्टला त्यांची बदली आदिवासी विकास विभागाचे सचिव म्हणून झाली. चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावरून कुणाल खेमनार यांची बदली हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली, पण तीनच दिवसांत त्यांना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केले.पुण्यात महापालिका आयुक्तांसह काही अधिकारी बदलले गेले. आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारनेही सातत्याने बदल्या केल्या, पण या सरकारने त्यापुढे पाऊल टाकल्याचे दिसते.मंत्र्यांना हवे मर्जीतील अधिकारीमंत्र्यांना आपल्या मर्जीचे हवे असलेले अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अशी प्रशासनात दोन सत्तास्थाने असणे, तीन पक्षांचे सरकार असणे, क्रीम पोस्टिंगसाठी अधिकाºयांची धडपड, एका शहरातील दोन वा तीन आयएएस अधिकाºयांमध्ये (जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आदी) विसंवाद असणे ही वारंवार बदल्यांची प्रमुख कारणे सांगितली जातात.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय