शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

७ वर्षांत आदिवासींच्या ११००० कोटीला कात्री; सरकारला उपरती, आता लोकसंख्येच्या अनुपातात निधी देण्याचा निर्णय

By यदू जोशी | Updated: October 14, 2023 14:33 IST

बोगस आदिवासी रोखण्यासाठी लवकरच कायदा...

यदु जोशी -

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातातच निधी मिळायला हवा, असा नियम असताना तो धाब्यावर बसवून गेल्या सात वर्षांत तब्बल ११ हजार १५४ कोटी रुपये कमी देण्यात आल्याची अधिकृत आकडेवारी हाती आली आहे. आता सरकारला उपरती आली असून लोकसंख्येनुसारच निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी मुंबईत राज्य जनजाती सल्लागार परिषदेची ५१वी बैठक झाली. या बैठकीत अधिकृतपणे सादर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. आदिवासींच्या हक्काच्या निधीत सरकार कपात करत असल्याबद्दल आदिवासी आमदारांनी या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तेव्हा, यापुढे २०११ च्या जनगणनेनुसार आदिवासींच्या विकासासाठी ९.३५ टक्के निधी खर्च केला जाईल, अशी हमी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. 

आदिवासी प्रकल्पांकडे दुर्लक्ष; आमदारांची तक्रार  राज्यात ३० आदिवासी प्रकल्प कार्यालये आहेत.तेथील प्रकल्प अधिकारी हे आयएएस असतात. मात्र, आदिवासी कल्याणाच्या योजनांकडे पुरेसे लक्ष देऊ शकले नाहीत, अशी तक्रार आमदारांनी बैठकीत केली 

बोगस आदिवासी रोखण्यासाठी लवकरच कायदाबोगस कागदपत्रे सादर करून आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी या बैठकीत करण्यात आली. अशा प्रकरणांमध्ये आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यासाठी लवकरच कायदा केला जाणार आहे.   

आकांक्षित तालुके तयार करणारकेंद्र सरकारने मानव निर्देशांकाच्या आधारे नंदुरबार व गडचिरोली हे आकांक्षित जिल्हे निश्चित केले आहेत. त्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग आकांक्षित तालुके तयार करणार आहे. त्यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्र