शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत १,१०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:11 IST

विदर्भातील सहा जिल्ह्यांची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, डोक्यावरील सावकारांचे कर्ज, मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहात त्यामुळे येणारे अडथळे अशा असंख्य विवंचनांमुळे पश्चिम विदर्भ व वर्धासह सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. आतापर्यंतच्या ११ महिन्यांत १,०५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आर्थिक संकटातून शेतकºयाला बाहेर आणण्यासाठी आधीच्या सरकारने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंत्यांत बहुतांश शेतकरी वंचित राहिले. त्या कर्जमाफीनंतरही विदर्भाच्या सहा जिल्ह्यांतील साडेतीन हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या.यंदा जानेवारीत ८५, फेब्रुवारीत ७८, मार्चमध्ये ९२, एप्रिलमध्ये ७८, मेमध्ये ९८, जूनमध्ये ९५, जुलैमध्ये १०५, आॅगस्टमध्ये ११४, सप्टेंबरात १०६ आॅक्टोबरात ८६, नोव्हेंबरात ९५ आणि १५ डिसेंबरपर्यंत ३५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या.१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्याया सहा जिल्ह्यांत २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. अमरावती व नागपूर विभागात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झाल्या आहेत.जाचक निकषामुळे फक्त ७,६६७ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र, तर८,९५० प्रकरणे अपात्र ठरली. शिवाय२९६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबितआहेत. आतापर्यंत ७,६३२ शेतकºयांच्या वारसांना मिळाली.२००५ पासून शासन मदतीत वाढ नाहीकर्जबाजारी, कर्जवसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास २००५च्या आदेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरूप आहे.गेल्या १४ वर्षांत त्यात बदल झाला नाही, शिवाय ज्या कर्जासाठी शेतकºयाने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व व्याज वाढते. त्यामुळे मृत शेतकºयाचा वारस बँकेचा थकबाकीदार ठरून, त्याला कर्ज मिळत नाही आणि तो अन्य लाभांपासून वंचित राहतो.सर्वाधिक आत्महत्या यवतमाळातयवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांनी शेतकरी आत्महत्या यंदा वाढल्या आहेत. यंदा सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही आत्महत्या (२५८) वाढल्या. अमरावती २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्ध्यात ७५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या