शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

सांगलीच्या ११ वर्षीय उर्वी पाटीलने हमता पास केला सर, विक्रमाची पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:01 IST

कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणा-या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षाच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंज मधील 14 हजार 400 फुटावरील हमता पास सर केला आहे. एवढया लहान वयात हमता पास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली असून मागील वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण केला होता.

ठळक मुद्देसांगलीच्या उर्वी पाटीलने केली ट्रेकींगच्या विक्रमाची पुनरावृत्ती११ वर्षाच्या उर्वीने पीरपंजाल रेंज मधील हमता पास केला सर

सांगली : कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणा-या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षाच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंज मधील 14 हजार 400 फुटावरील हमता पास सर केला आहे. एवढया लहान वयात हमता पास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली असून मागील वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण केला होता.उर्वीने आज नवी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली व आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली,आमच्या हमता ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कँप वरून 3 जून 2019 पासून झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक केले. पुढे 5 जून पासून प्रत्यक्ष ट्रेक ला सुरुवात झाली. रुमसू हा 6 हजार 100 फुटावरचा बेस कँप असून पुढे चिक्का(8,100फुट), जुआरु(9,800 फुट) आणि बालुका गेरा(12,000 फुट) असे कॅम्प करत 14,400 फुटावरील हमता पास सर केला. दिवसाला 7 ते 8 तासांचा डोंगर-द-या आाणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसात पूर्ण करताना शारीरिक व मानसीक क्षमतेचा कस लागणार होता, असा अनुभव उर्वीने व्यक्त केला.असा सर केला हमतापासहमतापास हा कुलु आणि स्पिती व्हॅलीला जोडणारा जुना मार्ग आहे. मार्गावरून तेबिटीयन लोकांची ये-जा होते. या मार्गाला सिल्क मार्ग म्हणूनही ओळखले जाते. या ट्रेकिंगमध्ये बालुका गेरा ते रतनथळी व्हाया हमता पास हा ट्रेक सर्वाधीक अवघड होता.

बालुका गेरा ते प्रत्यक्ष पास पर्यंत 8 तासांचा प्रवास पूर्णतः बर्फामधील असून सुमारे 2,400 फुट प्रत्यक्ष चढाईचे होते. शिवाय 10 हजार फुटांनंतर ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला पाऊस आणि पासवर बर्फवृष्टी असल्याने ट्रेक पूर्ण करताना दमछाक होत होती. पण, अशा अवघड पासवर पोहचल्याचा आनंदच काही और होता.अशीही होती रिस्क साधारणपणे अशा प्रकारचे ट्रेक 16 वर्षांच्या युवक -युवतींसाठी असतात मात्र, उर्वीने मागील वर्षी वयाच्या 10 व्या वर्षी अत्यंत अवघड सरपास सर केला होता, त्यामुळे यावर्षी कैलास रथ या ऍडव्हेंचर ग्रुपने तिला आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतले. तयारी उपयोगी आलीहिमालयातील हमतापास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसीक व शारीरिक रित्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार , व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रीत केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टी वरील वाळूत चालायचे व अर्धातास योगा व खास जीम करायची.

आहारामध्ये प्रामुख्याने सी फुड व सुका मेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल, ट्रेकींग बुट, स्टीकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वी ने आत्मविश्वासाने सांगितले. या ट्रेकसाठी आईस गाईड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी मदत केल्याचे उर्वी म्हणाली.

एवरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येयअवघड अशा सरपास सह हमतापास सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे आणि जगातील सर्वात अवघड एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने वाटचालीतील हे एक महत्वाचे पाऊल ठरेल व पुढील वर्षी पीन पार्वती आणि एवरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय आहे .उर्वी  अनिल पाटील

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशSangliसांगली