पिंपरी : जादा रकमेच्या परताव्याचे आमिष दाखवून चिटफंडमध्ये पैसे गुंतविण्यास भाग पाडून मुदतीनंतरही व्याज न देता महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चिटफंड चालकाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रामचंद्र रमेश जाधव (वय ३५, रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या चिटफंड चालकाचे नाव आहे. याबाबत मेघा कांबळे-काळभोर (वय २७, रा. निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रामचंद्र जाधव या आरोपीने मोरया चिटफंड नावाने चिटफंड संस्था सुरू केली. गुंतवणूकदार मेघा कांबळे यांना अधिकचे व्याजदर देण्याचे आमिष दाखवले होते. फसवणूक झाल्याने कांबळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. (प्रतिनिधी)
चिटफंडातील ११ लाख हडप
By admin | Updated: January 16, 2017 01:26 IST