मुंबई : प्रकाशनापूर्वीच दहावीचे पुस्तक व्हॉटसअॅपवर व्हायरल झाल्याने बुधवारी खळबळ उडाली. ही बाब महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या निदर्शनास येताच त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून दहावीच्या नवीन अभ्यासक्रम पुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. यापैकी विज्ञान आणि तंत्रज्ञान : भाग १ व २ या विषयाची पुस्तके प्रकाशनापूर्वीच व्हॉटसअॅपवर व्हायरल झाली. या प्रकरणाची दखल घेत मंडळाने व्हॉटसअॅपवर व्हायरल झालेली प्रत व मंडळाची प्रत याबाबत तपास करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासण्याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्रकाशनापूर्वीच व्हॉटसअॅपवर दहावीचे पुस्तक; दादर पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:39 IST