शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

‘१०८ रुग्णवाहिका’ ठरली जीवनदायिनी; एक कोटी रुग्णांना लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:04 IST

दहा वर्षात ४०,२१३ प्रसूती या रुग्णवाहिकेत झाल्या, रस्ते अपघात मृत्यूंमध्ये १४ टक्के घट झाली.

मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाने सार्वजनिक खासगी भागीदारीत राज्यात सुरू केलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवा ही राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरली असून ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १ कोटी रुग्णांना या रुग्णसेवेचा लाभ झाला आहे.

२६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) प्रकल्पांतर्गत  ही सेवा सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत १०८ रुग्णवाहिकेने राज्यातील सर्व भागातील १ कोटीहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. कोविड काळात या रुग्णवाहिकेने सहा लाख पेक्षा जास्त रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. कोविड काळात रुग्णाला बेड मिळणे अडचणीचे होते, या काळात अतिशय कमी वेळामध्ये १०८ कंट्रोल रूममधून खासगी रुग्णवाहिकांबरोबर समन्वय साधून रुग्णालयातील खाटांचे ‘रिअल टाइम’ उपलब्धतेसाठीही मदत करण्यात आली.

दहा वर्षात ४०,२१३ प्रसूती या रुग्णवाहिकेत झाल्या. एमईएमएस प्रकल्पामुळे माता मृत्यू दर ६८ वरून ४६ आणि बालमृत्यू दर २४ वरून १७ पर्यंत कमी झाला. रस्ते अपघात मृत्यूंमध्ये १४ टक्के घट झाली, असा दावा संंबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.

१२ हजार जणांना रोजगारया प्रकल्पात सध्या राज्यातील सहा हजारपेक्षा जास्त तरुण कार्यरत असून, नवीन निविदेच्या व्याप्तीनुसार, शासन व आरोग्य विभागातर्फे बारा हजारपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय शाळांमध्ये लाइफ सेव्हिंग ट्रेनिंग, ग्रामीण आणि शहरी भागात जीवन वाचवण्याचे प्रशिक्षण आणि १०८ सेवेच्या सक्रियतेबाबत प्रशिक्षण दिले आहे.

कुंभमेळ्यात, वारीत सेवाएमईएमएस प्रकल्पाने नाशिक महाकुंभमेळ्यात एक लाख रुग्ण व साधूंची सेवा केली. पंढरपूर आषाढी वारी दरम्यान ३ लाखाच्या घरात अत्यवस्थ रुग्णांची सेवा केली. भारतातील सर्वोत्तम शासित प्रणाली म्हणून एमईएमएस प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले असून आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.