शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - पृथ्वीराज चव्हाणांची टीका

By admin | Updated: September 2, 2014 16:02 IST

मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केले नसून या सरकारने संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २ -  'अच्छे दिन आयेंगे' असे सांगत जनसामान्यांवर आश्वासनांची बरसात करणा-या मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केले नसून त्यांनी संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी मोदी केंद्रात एकाधिकारशाही करत असून त्याचा फटका ज्येष्ठ नेत्यांनाही बसल्याचे म्हणाले. 
केंद्रात मंत्र्यांची संख्या कमी केली, खासगी सचिव नेमण्याचा अधिकारही कोणालाही देण्यात आलेला नाही, मंत्र्यावर पाळत ठेवली जाते, हा सर्व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. जनतेला 'चांगल्या दिवसांची ' स्वप्ने दाखवणा-या सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ केली, रेल्वेचे तिकीटदरही मोठ्या प्रमाणात वाढवले,  त्यामुळे हे सरकार 'गरिबांचे नव्हे तर धनदांडग्यांचे आहे', हे दिसत आहे असे ते म्हणाले. 
मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना कस्पटासमान लेखून संसदीय बोर्डातून बाहेर काढल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राज्यपालांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली व नवीन राज्यपालांची नेमणूक या सर्वांमुळे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी '५ सप्टेंबर' रोजी पंतप्रधानांचे भाषण सर्व विद्यार्थ्यांना ऐकवण्याच्या निर्णयवरही टीका केली. विद्यार्थ्यांनी आपलं भाषण ऐकलंच पाहिजे अशी सक्ती पंतप्रधानांनी केल्याची बाब चुकीची असल्याचे सांगत मुलांच्याबाबतीत अशी प्रपोगंडा करण्याची पद्धत अयोग्य असल्याचे चव्हाण म्हणाले.
भीषण ऊर्जाटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पंतप्रधानांनी स्वत: सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवायला हवी अशी मागणी आपण केल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कोळसा खाणींच्या वाटपासंदर्भात  सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वीजटंचाई टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 
दरम्यान, पंतप्रधान मुंबईत आले त्यावेळी आपण प्रत्येकवेळी प्रोटोकॉल पाळला. परंतु सभेमध्ये मी उपस्थित केलेल्या महत्वाच्या मुद्यांकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केल्याचे चव्हाण म्हणाले. तसेच आपल्या भाषणाच्यावेळी हेतुपुरस्सर व नियोजनपूर्वक हुल्लडबाजी केल्याचा आरोप पुन्हा चव्हाण यांनी केला. हे प्रकार महाराष्ट्र, झारखंड व हरयाणामध्ये झाले आणि त्यामुळेच हे उच्चस्तरावरून जाणीवपूर्वक केल्याचे दिसत आहे असे चव्हाण म्हणाले.
एकंदरच निवडणुकीच्यावेळी केलेल्या घोषणा, जाहिरातबाजी हे फक्त देखावे असून लोकांना दाखवलेले ' अच्छे दिनांचे स्वप्न' प्रत्यक्षात येताना दिसत नसल्याचे ते म्हणाले.