शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हिंदू- मुस्लिम सलोख्यासाठी कोकणात १०० वर्षांचा करार

By admin | Updated: February 9, 2015 12:22 IST

कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - धर्माच्या नावावर देशातील लोक एकमेकांना लक्ष्य करत असल्याचे पाहून गांधीजींना धक्का बसला असता, अशा शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे कान टोचले असतानाच कोकणातील एका गावाने हिंदू व मुस्लिमांदरम्यान  सलोखा टिकवण्यासाठी १०० वर्षांचा करार केला आहे. मुंबईपासून २२८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील बुरोंडी गावातील नागरिकांनी जातीय सलोखा टिकवण्यासाठी आपापसांत १०० वर्षांचा करार केला आहे. सुमारे ४००० हजार नागरिकांची वस्ती असलेल्या या गावाने जातीय संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही धर्मांच्या नागरिकांसाठी आचारसंहिताही आखली आहे. 
या तीन पानी करारात अनेक कलमे टाकण्यात आली असून गावातील पवित्र धार्मिक स्थळांजवळून जातानाही ते नियम आचरण्यात आणावे लागतील असे त्यात नमूद करण्यात आले आहे. 'गावातून हिंदू धर्मीयांतील नागरिकांची मिरवणूक निघाली असताना ते मशीदीजवळून जातानाही बँड वाजवू शकतात, मात्र त्याच वेळी नमाज सुरू असेल तर मशिदीपासून थोड्या अंतरावर मिरवमूक थांबवावी व नमाज पूर्ण झाल्यावरच पुढे जावे', असे एक कलम त्यात आले आहे. 
तसेच दहीहंडीदरम्यान गोविंदा पथकातील तरूण गावातील मशिदीच्या परिसरातूनही उत्साहाने जातील आणि त्याचवेळी दर्ग्याला नमनही करतील. गावातील एका ठराविक क्षेत्रात राहणारे हिंदू नागरिक करजागाव दर्ग्याच्या वार्षिक उत्सवादरम्यान मदत करतील, असेही त्यात म्हटले आहे. दोन्ही धर्मांचे नागरिक एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतील आणि त्यात सर्वांना सामावून घेतील. 
गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही धर्मांतील नागरिक मंचावर उपस्थित असले पाहिजेत आणि दोन्ही धर्मांतील ज्येष्ट नागरिकांचा योग्य सत्कार व्हावा, असेही त्या करारात नमूद करण्यात आले आहे. 
सध्या गावातील लोकसंख्येपैकी २० टक्के नागरिक मुस्लिम असून नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी दोन सदस्य हे मुस्लिम आहेत.  कोकणतील  इतर गावांप्रमाणेच बुरोंडीमध्येही जातीय सलोखा टिकून राहिला आहे.  लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान मशिदीजवळून जात असताना गाणी वाजवली गेल्यामुळे दोन्ही धर्मांच्या नागरिकांमध्ये १९८७ साली एकदाच संघर्ष निर्माण झाला होता. 
त्यानंतर बराच काळ गावात शांतता होती. मात्र तीन वर्षांपूर्वी गोविंदा पथकाची मिरवणूक मशिदीसमोरून तीन वेळा गेल्याने पुन्हा एकदा गावात संघर्षाचे ठिणगी पडली होती. त्यानंतर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही हा १०० वर्षीय करार करण्याचा निर्णय घेतला, असे गावचे सरपंच प्रदीप राणे यांनी सांगितले.