शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०० ‘जलदगती’ला निधी देण्यास नकार; राज्य सरकारवर पडणार ४८ कोटींचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 06:20 IST

२९,२७७ प्रकरणे प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महिला व बालकांवरील अत्याचारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी महाराष्ट्रात १३८ विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारने आखली, पण त्यापैकी १०० जलदगती न्यायालयांना निधी उपलब्ध करून देण्यास केंद्राने नकार दिला आहे.  परिणामी राज्याच्या तिजोरीवर ४८ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे. दुसरीकडे जलदगती न्यायालयांच्या अभावी महिला व बालकांवरील अत्याचारांची २९ हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत.

केंद्र सरकारने महिला व बालकांवरील अत्याचारांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापनेची तरतूद केली. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी देशात १ हजार २३ विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची योजना आहे. त्यात महाराष्ट्रात १३८ न्यायालये स्थापन होणार आहेत. या योजनेत केंद्राचा ६० टक्के तर राज्य सरकारचा ४० टक्के हिस्सा आहे.

राज्यात गेल्यावर्षी मार्चअखेरपर्यंत ३३ विशेष जलदगती न्यायालये कार्यान्वित असल्याने स्थापन होणाऱ्या सर्व १३८ विशेष जलदगती न्यायालयांना निधी देण्याची विनंती केंद्राला करण्यात आली होती. पण केवळ ३८ न्यायालयांना निधी देण्यात येईल असे केंद्राच्या विधी व न्याय खात्याने महाराष्ट्र सरकारला कळवले. त्यामुळे उर्वरित १०० न्यायालयांसाठी होणारा खर्च राज्याला उचलावा लागेल असे केंद्र सरकारच्यावतीने कळवण्यात आले. या न्यायालयांसाठी राज्य सरकारने ६४ कोटी २१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती पण केंद्राने निधी देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारवर ४७ कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक भार येणार आहे. 

२९,२७७ प्रकरणे प्रलंबित

गृहविभागाच्या अहवालानुसार राज्यात महिलावंरील बलात्काराची १० हजार २७७ व पोक्सो कायद्याअंतर्गत बालकांवरील १८ हजार ९४४ अशी एकू २९ हजार २७७ प्रकरणे प्रलंबित आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार