शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० ‘ई-शिवाई’; सणासुदीत प्रवाशांना मिळणार जादा गाड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:59 IST

चालक-वाहकांसाठी एसी रेस्ट हाऊस...

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळ  सध्या वाहनखरेदीवर भर देत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीच्या ताफ्यात १२ मीटर लांबीच्या आणखी १०० ई-शिवाई गाड्या दाखल होणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची आसनक्षमता अधिक आहे. त्यामुळे सणासुदीत प्रवाशांना आणखी बस मिळणार आहेत. 

एसटीने ५,१५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी १३८ मिडी ई-बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर-चंद्रपूर या मार्गावर, त्यानंतर नाशिक-बोरीवली तसेच नाशिक-छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीटदर सध्या चलनात असलेल्या ई-शिवाई बसेसप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे. 

ई-शिवनेरी १००वरमुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात १७ नव्या बस दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत या मार्गावर ८३ गाड्या होत्या. नवीन बसगाड्यांच्या समावेशामुळे ई-शिवनेरीची संख्या आता १०० वर पोहोचली आहे. त्यामुळे  दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

चालक-वाहकांसाठी एसी रेस्ट हाऊसमुंबई : राज्य परिवहन महामंडळाने वाहक आणि चालकांसाठी मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये वातानुकूलित विश्रामगृह सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. हे राज्यातील पहिले एसी विश्रामगृह असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. 

  या रेस्ट हाऊसमध्ये ३ कक्ष असून त्यामध्ये मुंबई आगारातील १०० आणि राज्यातील वेगवेगळ्या आगारातून बस घेऊन येणारे सुमारे ३०० चालक-वाहक आराम करू शकतात. सुमारे ९० लाख रुपये खर्चून या विश्रांती कक्षांमध्ये टू टिअर बॅक बेड सह, करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल, स्वच्छ व टापटीप अशी प्रसाधनगृहे तयार करण्यात आली आहेत.  एसटी महामंडळ अशाच प्रकारचे वातानुकूलित विश्रांती कक्ष परळ, कुर्ला नेहरूनगर, बोरवली नॅन्सी कॉलनी येथील आगारात तयार करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ठाण्यातील खोपट एसटी बस स्थानकामध्ये चालक वाहकांसाठी  वातानुकूलित कक्ष तयार केला  आहे.  

टॅग्स :passengerप्रवासीBus Driverबसचालक