शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींचा तंबाखूजन्य माल जप्त

By admin | Updated: April 6, 2017 05:43 IST

वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे गुटखा, तंबाखू, पानमसाला व सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी घालण्यात आली.

स्नेहा मोरे,मुंबई- वाढत्या व्यसनाधिनतेला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे गुटखा, तंबाखू, पानमसाला व सुगंधित सुपारी विक्रीवर बंदी घालण्यात आली. मात्र, तरीही राज्यभरात त्याची छुपी विक्री होत असते. ती रोखण्यासाठी वेळोवेळी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यानुसार, गेल्या सव्वाचार वर्षांत महाराष्ट्र राज्याच्या या अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत, गुटखा, तंबाखूसह सुगंधी सुपारी, पानमसाला आदी तब्बल १०० कोटी १३ लाखांचा माल जप्त केला आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान एफडीएने गुटखा, तंबाखूसह सुगंधी सुपारी व पानमसाला व तत्सम पदार्थांवर केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई २०१५-१६ या वर्षात केली आहे. या विभागाने गेल्या वर्षात २४ कोटी ३७ लाख २० हजार ९८१ रुपयांचा माल जप्त केला आहे, तर २०१३-१४ या वर्षात १ हजार ११५ आस्थापने आणि व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, २०१२-१३ या कालावधीत सर्वाधिक ९७२ खटले दाखल करण्यात आले आहेत.२० जुलै २०१६ ते २६ मार्च २०१७ या कालावधीत ३ हजार ७५३ आस्थापनांची तपासणी केली असून, त्यामध्ये १ हजार १४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील ८६ आस्थापनांवर एफआयआर दाखल करण्यात आले. या कारवाईत २१ कोटी ८१ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला, तर २४८ आस्थापनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. २०१२ ते २०१७ या काळात १०० कोटी १३ लाख ५६ हजार ४४ कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती, अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘लोकमत’ला दिली.>आजारांचे वाढते प्रमाणग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षण २०१० नुसार, भारतातील ३५ टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. म्हणजेच आकडेवारीनुसार देशात २७.५ कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यातील १६.३७ कोटी व्यक्ती धूरमुक्त तंबाखूचे सेवन करतात. ६.९ कोटी धूम्रपान करत असून, ४.२३ कोटी व्यक्ती धूम्रपान आण धूरमुक्त तंबाखूचे सेवन करतात. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०११ मध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांवर, भारताला १ लाख ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करावे लागले होते.गुटखा, तंबाखू, पानमसाला या पदार्थांची विक्री आणि अवैध साठ्यावर धाड टाकून एफडीएने वेळोवेळी सतर्कता दाखविली आहे. गेल्या काही वर्षांतील अशा प्रकारच्या धडक कारवायांमुळे या विभागाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. भविष्यात या विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देणार आहे.- डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग