शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

नराधमास १० वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: December 27, 2015 01:04 IST

इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या शाहनवाज शमसुद्दीन भडगावकर या कल्याण येथील तरुणाचे अपिल फेटाळताना स्वत:हून शिक्षा वाढवून उच्च न्यायालयाने

मुंबई: इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या शाहनवाज शमसुद्दीन भडगावकर या कल्याण येथील तरुणाचे अपिल फेटाळताना स्वत:हून शिक्षा वाढवून उच्च न्यायालयाने त्याला १० वर्षांची सक्तमजुरी ठोठावली आहे.अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी भादंवि कलम ३७६ (२) (एफ) मध्ये किमान १० वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तरीही कल्याणच्या सत्र न्यायालयाने शाहनवाजला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध त्याने केलेले अपील उच्च न्यायालयात सुनावणीस आले तोपर्यंत ही शिक्षा पूर्ण भोगून शाहनवाज गेल्या जुलैमध्ये तुरुंगातून बाहेरही आला होता. न्या. साधना जाधव यांनी अपील सुनावणीस घेतानाच त्याला शिक्षावाढीची नोटीस काढली आणि न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढले. अपील फेटाळून न्या. जाधव यांनी त्यास लगेच ताब्यात घेतले आणि आणखी पाच वर्षांची सक्तमजुरी भोगण्यासाठी त्याची तुरुंगात रवानगी केली.स्वाभिमानाने जगणे हा प्रत्येक स्त्रिचा मुलभूत हक्क आहे. बलात्काराने स्त्रिचे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होते. अशा परिस्थितीत कायद्याने ठरवून दिलेल्या किमान शिक्षेहून कमी शिक्षा देणे सर्वस्वी चुकीचे ठरते, असे न्या. जाधव यांनी नमूद केले. एवढेच नव्हे तर शाहनवाज याने केलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आता उर्वरित पाच वर्षांची शिक्षा भोगत असताना त्याला शिक्षेत कोणतीही सूट वा सवलत दिली जाऊ नये,असे निर्देशही त्यांनी दिले.शाहनवाज हा चिकणघर, कल्याण (प.) येथे राहणारा आहे. समोरच्या चाळीत राहणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल त्याला ही शिक्षा झाली. गुन्हा घडला तेव्हा ही मुलगी एका कॉन्व्हेन्ट शाळेत इयत्ता चौथीत शिकत होती. १५ नोव्हेंबर २०१० रोजी शाहनवाजने या मुलीला स्वत:च्या घरात बोलावून घेतले व मोबाईलवर आधी अश्लिल चित्रफिती दाखवून नंतर तिच्यावर बलात्कार केला होता. अपिलाच्या सुनावणीत आरोपीतर्फे अ‍ॅड. सुदीप पासबोला व अ‍ॅड. उमर काझी यांनी तर सरकारतर्फे सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेट यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)आजी करते सांभाळबलात्कार झालेल्या या मुलीच्या आई-वडिलांचे एड्सने निधन झाले आहे. होली क्रॉस शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरी करणारी आजी तिचा सांभाळ करते. तिचे आजोबा अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेले असून त्यांना स्मृतिभ्रंशही झाला आहे. ही मुलगीही एचआयव्ही बाधित असून तिच्यावर शीवच्या लो. टिळक रुग्णालयात त्यासाठी उपचारही सुरु आहेत.