शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १० कुमारी मातांचे लावले विवाह; ९२ मातांचे भवितव्य अंधारातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 02:06 IST

आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत.

यवतमाळ : आरोग्य विभागाची स्थानिक यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व ग्रामस्थांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील १०२ पैकी १० कुमारी मातांचा विवाह लावून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या संसाराला लागल्या आहेत. मात्र उर्वरित ९२ कुमारी मातांचा प्रश्न अजून तसाच आहे.जिल्ह्यातील झरी जामणी, वणी, राळेगाव आणि पांढरकवडा भागातील कुमारी मातांच्या प्रश्नाने समाजमन सुन्न झाले आहे. येथे बहुतांश बंजारा समाजाची वस्ती आहे. शासनाच्या पुढाकारातून वर्षभरात १० कुमारी मातांच्या ‘पती’चा शोध लागला. यातील बहुतांश युवक गावातीलच असल्याची बाब पुढे आली. त्यांच्याशी चर्चा करून सामंजस्याने विवाह लावून देण्यात यश आले. या कुमारी मातांना आता अपले हक्काचे घर मिळाले आहे.मात्र ९२ कुमारी मातांचे पती अजूनही बेपत्ता आहेत. यातील अनेक कुमारी मातांना त्यांच्या पतीचे नाव माहिती नाही. ते कुठे राहतात, काय करतात हेही माहीत नाही. कुमारी मातांचे माता पिताही निरक्षर आणि गरीब आहेत. त्यांना या प्रकरणात काय करायचे, कुणाकडे न्याय मागायचा, याची माहितीच नाही. यामुळेअशा प्रकरणात तक्रारी दाखलझाल्या नसल्याची माहिती सूत्रानी दिली.एका गावात पाच कुमारी माता असल्याचे पाहणीत उघड झाले आहे. या कुमारी माता वयाने लहान असून त्यांचे बाळ कुपोषित आहे. आपला आणि मुलाचा सांभाळ कसा करावा, हेदेखील त्यांना कळणे सध्या अवघड आहे. अनेक बालकांचे लसीकरणही झालेले नाही.गरोदर मातांच्यानोंदी घेण्याचे आदेशआरोग्य विभागाच्या स्थानिक यंत्रणेच्या पुढाकारातून कुमारी मातांचा विवाह लावण्यात आला. आरोग्य सेविकांना गरोदर मातांच्या सर्व नोंदी घेण्याचे आदेश दिले आहे. अनेक कुमारी मातांचे पालक नाव लिहू नका असे म्हणतात. मात्र ट्रिटमेंट दिली जाते, अशी माहिती यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला