चालक ताब्यात : सिनेस्टाईल पाठलाग करून पकडलेनागपूर : अंबाझरी पोलिसांनी १० लाख रुपये रोख असलेली कार पकडून चालकास ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी रात्री १० च्या सुमारास रामनगर भागात घडली.शनिवारी रात्रीच्या सुमारास पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कातकडे गस्त घालत होते. दरम्यान, अंबाझरी टी-पॉर्इंटजवळ त्यांना एमएच ३६, एच १००९ क्रमांकाची कार जाताना दिसली. त्यांना या कारवर शंका आली. त्यांनी या कारचा पाठलाग सुरू केला. त्यांनी या कारला थांबण्यास सांगितले. परंतु पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून कारचालकाने कारचा वेग आणखी वाढविला. अखेर या कारचा पाठलाग करून अंबाझरी पोलिसांनी रामनगर भागात या कारला थांबविले. कारचा चालक मोहम्मद अली यास ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास अंबाझरी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
१० लाखाची रोकड पकडली
By admin | Updated: October 13, 2014 01:24 IST