शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये डोंबिवलीचे १० भाविक ठार, भीषण अपघातात एकाच कुटुंबावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:46 IST

अहमदाबादजवळील तागडी गावानजीक जीपचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाºया ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पलिताना या जैन तीर्थस्थळाला निघालेले डोंबिवलीतील १० भाविक व जीपचालक अशा ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवली : अहमदाबादजवळील तागडी गावानजीक जीपचालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाºया ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पलिताना या जैन तीर्थस्थळाला निघालेले डोंबिवलीतील १० भाविक व जीपचालक अशा ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पर्युषण पर्व सांगतेला एकाच कुटुंबातील भाविकांवर मृत्यूने घाला घातल्याचे कळताच डोंबिवलीत शोककळा पसरली.डोंबिवली पूर्वेतील कस्तुरी प्लाझानजीक असलेल्या निशिगंधा इमारतीत राहणाºया किरण कमलेश शहा, त्यांची मुलगी जिनाली व मुलगा नेमिल, निळकंठ पूजा इमारतीत राहणारे शशिकांत शहा, त्यांची पत्नी रिटा आणि मुलगी धरा, वीणा सोसायटीत राहणारे हितेश शहा, त्यांची पत्नी विभा आणि भाचा नंदीप शहा यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. जैनम हा शशिकांत शहा यांचा १७ वर्षांचा मुलगा बचावला. तो गंभीर जखमी आहे. इतर मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. शशिकांत शहा व कमलेश शहा हे सख्खे भाऊ. त्यापैकी कमलेश यांचा सात वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हितेश शहा हे शशिकांत यांचे आतेभाऊ होते. भावनगर जिल्ह्यातील पलिताना या प्रसिद्ध जैन तीर्थस्थळाला जाण्यासाठी शहा कुटुंबीयांनी शनिवारी सकाळीच गुजरातला जाण्यासाठी कर्णावती एक्स्प्रेस पकडली. बडोद्यात बहीण जयश्री यांच्या घरी रात्रीचे जेवण उरकले. पहाटे साडेपाचला खासगी गाडीने पलिताना येथे दर्शनाला निघाले. जीपचालकाने एका गॅस सिलिंडरच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव जीपने विरुद्ध दिशेने येणाºया ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात जीपचालकासह ११ जणांचा मृत्यू झाला. मृतदेह जवळच्या ज्या रुग्णालयात हलविण्यात आले, तेथील डॉक्टरांनी कमलेश यांचा साडू प्रकाश याच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. अपघातात शहा कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजताच प्रकाश सुन्नच झाले. ज्या बहिणीच्या घरी त्यांनी जेवण घेतले, ती बहीणही मृत्युमुखी पडल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. पण नंतर ती गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.८० वर्षीय आई अनभिज्ञहितेश शहा यांची आई हसुमतीशहा या ८० वर्षांच्या असल्यानेत्यांना सोबत नेले नव्हते. त्या वीणा सोसायटीतच आहेत. त्यांना धक्का बसू नये म्हणून मुलगा, सून आणिनातू अपघातात मरण पावल्याची माहिती त्यांना देण्यात आलेली नाही. सोसायटीत लोक जमल्याने त्या सतत चौकशी करत आहेत, पण त्यांना कोणीही माहिती दिलेली नाही.

टॅग्स :Accidentअपघात