शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' 10 दिवसाच्या बाळाला स्वतः आईनेच फेकलं नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 10:17 IST

त्या 10 दिवसाच्या बाळाचं अपहरण हा बनाव असल्याचं समोर आलं आहे.

ठळक मुद्देत्या 10 दिवसाच्या बाळाचं अपहरण हा बनाव असल्याचं समोर आलं आहे0 दिवसाच्या बाळाला पुलावरून खाली नदीत फेकल्याचं उघड झालं आहे. रेश्मा शेख यांनी फेकलेलं बाळ त्याचं चौथं अपत्य होतं.

पुणे, दि. 17- . बोपोडी येथे बुधवारी भरदिवसा रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पण आता त्या 10 दिवसाच्या बाळाचं अपहरण हा बनाव असल्याचं समोर आलं आहे.  रेश्मा शेख या महिलेने स्वतः तिच्या 10 दिवसाच्या बाळाला पुलावरून खाली नदीत फेकल्याचं उघड झालं आहे. रेश्मा शेख यांनी फेकलेलं बाळ त्याचं चौथं अपत्य होतं. बाळाला पुलावरून नदीत टाकल्यावर या महिलेने बाळाचं अपहरण झाल्याचा कांगावा केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 

बाळाचं अपहरण झाल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपासा दरम्यान रेश्मा शेख या महिलेने तिच्या कृत्याची कबूली दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या महिलेची कसून चौकशी केली जात असून नदीत टाकलेल्या बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. या महिलेने हा प्रकार नेमका का केला? याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातो आहे. 

नेमकं काय घडलं ?बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास  रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. रेश्मा शेख (वय 20 रा. दापोडी) बोपोडीतील खासगी रूग्णालयातून एका शेअर  रिक्षात बसून दापोडीकडे  घरी परत येत असताना त्या रिक्षात आगोदर बसलेल्या अनोळखी महिलेने रेश्मा शेखला धक्का मारून रिक्षाबाहेर ढकलून दिले. तिचे दहा दिवसांचे बाळ रिक्षावाल्याच्या मदतीने पळवून नेलं, असं त्या महिलेने सांगितलं होतं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा शेख या बोपोडीतील एका खासगी रुग्णालयात  रिक्षातून दहा दिवसांच्या मुलीला घेऊन गेल्या. मुलीला रूग्णालयात घेऊन गेल्यानंतर परत येत असताना, शेख शेअर रिक्षामध्ये बसल्या. त्या रिक्षात आगोदरपासूनच एक महिला प्रवास करत होती. त्या रिक्षात बसल्यावर काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी उतरायचं होतं ते ठिकाण येताच रिक्षावाल्याला पैसे द्यावयाचे असल्याने त्यांनी आपले बाळ जवळ बसलेल्या महिलेकडे दिलं. त्यानंतर आरोपी महिलेने शेख यांना जोराचा धक्का दिला, शेख रिक्षातून खाली पडल्या. तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. बाळाला घेऊन ती महिला रिक्षातून पळून गेली. हॅरिस पुलाखालील रस्त्याने रिक्षा निघून गेली, अशी माहिती समोर आली होती.